
तिरुअनंतपुरम - तामिळनाडूच्या करूरमध्ये धार्मिक फूट निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका हिंदू मुन्नानी संघटनेच्या कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे. शक्ती (३२) असे आरोपीचे नाव असून तो वेंगामेडू ज्योतिदार स्ट्रीट येथील रहिवासी आहे. (Hindu Munnani worker arrested for asking people to buy only from shops run by Hindus)
हिंदू मुन्नानीचा करूर जिल्हा समन्वयक शक्ती, हिंदूंना दिवाळीच्या वेळी हिंदूंकडून चालवल्या जाणार्या दुकानांमधूनच खरेदी करण्याचे आवाहन करणारी पत्रके वितरीत करताना दिसला होता. त्यांनी ग्राहकांना दुकानातून वस्तू खरेदी करण्यापूर्वी प्रथम दुकानातील हिंदू देवतांची चित्रे पाहण्याचे आवाहन केले आहे.
आयपीसी कलम 153A (धर्म, वंश, जन्मस्थान, निवासस्थान, भाषा इत्यादी कारणांवरून विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि सद्भाव राखण्यासाठी प्रतिकूल कृत्ये करणे) आणि 505 (सार्वजनिक क्षोभ निर्माण करणारी विधाने) अंतर्गत शक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीच्या आधारे, करूर जिल्ह्यातील वेंगमेडू पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक उदयकुमार यांनी गुन्हा दाखल केला असून शक्तीला अटक केली आहे. शक्तीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.