हिंदू सुरक्षित असेल तर मुस्लिमही सुरक्षित असतील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

yogi adityanath

‘... तरच मुस्लिमाचे घर सुरक्षित राहील’

जेव्हा दंगल होते तेव्हा प्रत्येक धर्म आणि पंथांचे लोक प्रभावित होतात. हिंदूचे (Hindu) घर जाळले तर मुस्लिमाचे घर सुरक्षित राहणार नाही. हिंदू सुरक्षित असेल तर मुस्लिमही सुरक्षित असतील. हिंदूचे घर सुरक्षित असेल तर मुस्लिमाचे (Muslim) घरही सुरक्षित राहील. आम्ही पाच वर्षांत एकही दंगल होऊ दिली नाही, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत होते.

१९९० मध्ये काँग्रेसविरोधी लाटेत विविध पक्षांना सत्ता मिळाली. त्यावेळी रामभक्तांवर गोळीबाराचे पाप समाजवादी पक्षाने केले. केवळ १९९० मध्येच नाही तर त्यानंतरही समाजवादी पक्षाला जेव्हा-जेव्हा संधी मिळाली तेव्हा कोणीही स्वतःला सुरक्षित समजू शकले नाही. सपा सरकारच्या काळात राज्य दंगलीच्या आगीत जळत होते. आज आपण राज्य दंगलमुक्त केले असे म्हणता येईल, असेही मुख्यमंत्री योगी (Yogi Adityanath) म्हणाले.

हेही वाचा: माँ जिजाऊंच्या राजवाड्यासमोर उभारला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

भव्य राम मंदिर उभारणीच्या दिशेने आपण प्रगती केल्याचे त्यांनी पाहिले. राष्ट्रवाद हा आमचा अजेंडा आहे. राम मंदिर हा सांस्कृतिक राष्ट्रवादाचा भाग आहे. विश्वनाथाचे धाम आणि कुंभ हे देखील त्याचाच एक भाग आहेत. पवित्र भूमीला दिव्य आणि भव्य बनवणे हा राष्ट्रवादाचा भाग आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

‘बेटा आता तू कामातून गेला...’

अखिलेश यादव यांच्या स्वप्नात कृष्ण आले असेल तर ते म्हणाले असेल ‘बेटा आता तू कामातून गेला, तुझ्या वाट्याला फक्त तीन जागा येतील आणि उर्वरित चारशे जागा भाजपला मिळतील. ज्यांची भगवान राम आणि कृष्णावर श्रद्धा नव्हती ते आज कोणत्या तोंडाने राम आणि कृष्णाची नावे घेत आहेत. जेव्हा काँग्रेसने राम सेतूबद्दल सांगितले की, राम हे मिथक आहे. त्यावेळी समाजवादी पक्ष काँग्रेसला पाठिंबा देत होता, असे अखिलेश यादव यांच्या स्वप्नात कृष्ण आल्याच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) म्हणाले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top