माँ जिजाऊंच्या राजवाड्यासमोर उभारला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

राजमाता जिजाऊ यांच्या राजवाड्यासमोर अज्ञात व्यक्तीने उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा
राजमाता जिजाऊ यांच्या राजवाड्यासमोर अज्ञात व्यक्तीने उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळाराजमाता जिजाऊ यांच्या राजवाड्यासमोर अज्ञात व्यक्तीने उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा

सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) : मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे राजमाता माँ जिजाऊ (Mother Jijau) यांच्या राजवाड्यासमोर कुणीतरी ८ जानेवारीच्या मध्यरात्री अश्‍वारूढ असा १२ ते १४ फुटाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा (Statue) उभारला आहे. ही बाब सकाळी अघडकीस आली. यानंतर प्रशासनाकडून पाहणी करून पुतळा कोणी बसवला याचा तपास सुरू झाला.

माँ साहेब जिजाऊ जन्मोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यावर्षी जिजाऊ जन्मोत्सव ऑनलाइन होणार आहे. अशात कोणीतरी परवानगी न घेता अश्‍वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्यामुळे काय करावे, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj) त्या ठिकाणी ठेवायचा की इतरत्र हलवायचा या संदर्भामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे नगर परिषद मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी सांगितले. रविवारी सायंकाळी पाच वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीमध्ये निर्णय झाल्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कुणी पुतळा बसविला या संदर्भात पोलिस विभागाकडून तपास सुरू आहे.

राजमाता जिजाऊ यांच्या राजवाड्यासमोर अज्ञात व्यक्तीने उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा
आयशा मलिक होणार पाकिस्तानच्या पहिल्या महिला न्यायाधीश

सोशल मीडियावर जल्लोष

राजमाता जिजाऊ यांच्या राजवाड्यासमोर अज्ञात व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा बसविल्यानंतर सोशल मीडियावर जल्लोष पाहायला मिळत आहे. अनेक व्यक्तींच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो व व्हिडिओ पाहायला मिळत आहे.

पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

अज्ञात व्यक्तीने राजमाता जिजाऊ यांच्या राजवाड्यासमोर ८ जानेवारीच्या रात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj) उभा केला. सकाळी अश्‍वारूढ पुतळ्याची पाहणी नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आली. पुतळा बसविण्याच्या संदर्भामध्ये प्रशासनाकडून कोणतीही परवानगी घेतली नसल्यामुळे अज्ञात व्यक्तीविरुद्ध नगरपरिषदेकडून पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे, असे नगर परिषद मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com