हिंदूत्वाची ISISसोबत तुलना; वादावर खुर्शीद म्हणतात, 'देशात स्वातंत्र्य आहे की नाही?' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिंदूत्वाची ISISसोबत तुलना; वादावर खुर्शीद म्हणतात, 'देशात स्वातंत्र्य आहे की नाही?'

हिंदूत्वाची ISISसोबत तुलना; वादावर खुर्शीद म्हणतात, 'देशात स्वातंत्र्य आहे की नाही?'

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांचे पुस्तक 'Sunrise Over Ayodhya: Nationhood in Our Times' नुकतंच प्रकाशित झालं असून ते वादग्रस्त ठरलं आहे. या पुस्तकातील एक प्रकरण 'द सॅफ्रॉन स्काय' मध्ये मांडण्यात आलेल्या एका विधानावरुन हा वाद सुरु झाला आहे. खुर्शीद यांनी हिंदुत्वाची तुलना दहशतवादी संघटना ISIS आणि बोको हरामसोबत केली आहे. त्यांच्या या पुस्तकातील मांडणीचा फोटो भाजपचे आयटी हेड अमित मालवीय यांनी ट्विट देखील केला आहे.

हेही वाचा: विरोधकांनी तिसऱ्या लाटेची तयारी करु नये - संजय राऊत

अमित मालवीय यांनी ट्विट करत म्हटलंय की, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी त्यांच्या नवीन पुस्तकात लिहलंय की, हिंदुत्व हे ISIS आणि बोको हरामसारख्या जिहादी इस्लामी गटांसारखेच आहे. इस्लामिक जिहादशी बरोबरी साधण्यासाठी तसेच मुस्लिम मते मिळवण्यासाठी ज्यांच्या पक्षाने 'भगवा दहशतवाद' हा शब्दप्रयोग केला आहे, त्यांच्याकडून आपण आणखी काय अपेक्षा करू शकतो? असा सवालही त्यांनी केला आहे.

याबाबत स्पष्टीकरण देताना खुर्शीद यांनी म्हटलंय की, हिंदू धर्म हा खूपच सुंदर धर्म आहे. तसेच भाजप आणि RSSच्या वतीने त्यांच्याविरुद्ध कुणीतरी तक्रार दाखल करणे याहून दुसरा मोठा अपमान नाही. या देशात स्वातंत्र्य आहे की नाही? आपल्याला विचार करण्याचे आणि बोलण्याचे स्वातंत्र्य उरलं आहे का? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.

हेही वाचा: गुजरातमध्ये 350 कोटींच्या ड्रग्जसह एकाला अटक; पाकिस्तान कनेक्शन?

पुढे त्यांनी म्हटलंय की, याबाबत प्रश्न करणाऱ्यांनी काही ओळी नव्हे तर संपूर्ण पुस्तक वाचावं. मी हिंदू आणि सनातन धर्माची प्रशंसाचं केली आहे. मी त्याचा आदरही करतो. मात्र, ज्यापद्धतीने सध्या त्यांनी 'हिंदूत्व' नावाखाली या धर्माची रचना आणि व्याख्या मांडून ठेवली आहे, ती कोणत्याही सुसंस्कृत व्यक्तीला पूर्णपणे अस्वीकार्य आहे.

बोको हराम आणि ISIS शी तुलना

सलमान खुर्शीद यांनी पुस्तकात लिहलंय की, सध्याच्या हिंदुत्वाचं राजकीय रुप, साधू-संतांच्या सनातन आणि प्राचीन हिंदू धर्मापेक्षा वेगळं आहे. ते ISIS आणि बोको हरामसारख्या जिहादी इस्लामी संघटनांसारखं आहे. त्यांच्या या विधानावरुनच सध्या वाद सुरु आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना खुर्शीद यांनी म्हटलंय की, याबाबत प्रश्न करणाऱ्यांनी काही ओळी नव्हे तर संपूर्ण पुस्तक वाचावं. सलमान खुर्शीद यांनी या पुस्तकात अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यापासून ते जमीनीबाबतच्या वादावरील निर्णय येईपर्यंतच्या घटनाक्रमाबाबत आपली मते मांडली आहेत.

loading image
go to top