हिंदू मंदिरांत अजानपेक्षा मोठ्या आवाजात हनुमान चालिसा म्हणणार : श्रीराम सेना I Pramod Muthalik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pramod Muthalik

'मुस्लिमांविरोधात कारवाई केली नाही, तर तुमचे 150 चे मिशन साकार होणार नाही.'

हिंदू मंदिरांत अजानपेक्षा मोठ्या आवाजात हनुमान चालिसा म्हणणार : श्रीराम सेना

बेळगाव : महाराष्ट्रात मनसेच्या (MNS) वतीनं मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी आंदोलन सुरुय. तर, दुसरीकडं येत्या 9 मे पासून पहाटे 5 पासून कर्नाटक राज्यातील मंदिरामध्ये अजानपेक्षा जास्त आवाजात हनुमान चालिसा म्हणण्यात येईल, अशी माहिती श्रीराम सेनेचे (Shriram Sena) राष्ट्रीय प्रमुख प्रमोद मुतालिक (Pramod Muthalik) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बेळगाव (Belgaum) शहरातील कन्नड साहित्य भवनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना मुतालिक यांनी ही माहिती दिलीय. राज्यातील हिंदू मंदिरात भजन व हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) मुस्लिमांच्या (Muslim) अजाणपेक्षा दुप्पट आवाजात म्हणण्यात येणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा: शाहू महाराजांच्या शताब्दीच्या पूर्वसंध्येला कोल्हापुरात 'कॅन्डल मार्च'

आपला अजानला विरोध नसून त्यामुळं होणाऱ्या कर्णकर्कश आवाजामुळं होणाऱ्या त्रासाला विरोध आहे. यामुळं कर्नाटकात देखील माईक जप्तीची कारवाई झाली पाहिजे. भाजप सरकारनं (BJP Government) मुस्लिमांच्या माईक विरोधात कारवाई केली नाही, तर तुमचे 150 चे मिशन साकार होणार नाही. मुस्लिमांचे एकही मत भाजपला पडत नाही, तरी देखील त्यांची पर्वा का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

Web Title: Hindu Temples Hanuman Chalisa Will Say Out Loud Shri Ram Sena Pramod Muthalik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top