वाहन उद्योग अक्षरशः झोपला; आणखी एका बड्या कंपनीकडून काम बंदची घोषण

टीम ई-सकाळ
Tuesday, 10 September 2019

चेन्नई : देशभरातील ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये असलेल्या स्लो डाऊन अर्थात मंदीची तीव्रता आणखी वाढू लागली आहे. मारुतीसह इतर कार आणि बाईक निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये कामगार कपात आणि कामाचे दिवस कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात आता हिंदुजा ग्रुपच्या अशोक लेलँड कंपनीची भर पडली आहे.

चेन्नई : देशभरातील ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये असलेल्या स्लो डाऊन अर्थात मंदीची तीव्रता आणखी वाढू लागली आहे. मारुतीसह इतर कार आणि बाईक निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये कामगार कपात आणि कामाचे दिवस कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात आता हिंदुजा ग्रुपच्या अशोक लेलँड कंपनीची भर पडली आहे.

आणखी वाचा : वाहन उद्योगाचा ‘रिव्हर्स गिअर’

ठे किती दिवस काम बंद?
हिंदूजा ग्रुपच्या अशोक लेलँड या अवजड वाहन निर्मितीचे देशभरात पाच प्लँट आहेत. त्या पाचही प्लँटमध्ये या महिन्यासाठी नॉन वर्किंग डे जाहीर करण्यात आले आहेत. उत्तराखंडमधील पंतनगर या सर्वांत मोठ्या प्लँटमध्ये महिनाभरात सर्वाधिक १८ नॉन वर्किंग डे जाहीर करण्यात आले आहेत. तमीळनाडूतील एन्नोर, होसूर तसेच महाराष्ट्रातील भंडारा आणि राजस्थानातील अल्वर येथील प्रकल्पामध्येही नॉन वर्किंग डे जाहीर करण्यात आले आहेत. एन्नोरमद्ये १६, अल्वर, भंडाऱ्यात १० तर होसूर प्रकल्पात दोन नॉन वर्किंग डे जाहीर करण्यात आले आहेत.

आणखी वाचा : वाहन उद्योगाचा ‘रिव्हर्स गिअर’

मागणी झाली मोठी घट
अशोक लेलँड कंपनीचे चेन्नईत मुख्यालय असून, अवजड वाहनांच्या देशांतर्गत मागणीत ५-१० नव्हे तर, ५० टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या वर्षी देशात ऑगस्टमध्ये १६ हजार ६२८ वाहनांची विक्री झाली होती. तर गेल्या महिन्यात ही विक्री ८ हजार २९६ वर आली आहे. निर्यातीचा विचार केला तर, गेल्या महिन्यात ९ हजार २३१ वाहनांची विक्री झाली आहे. कंपनीकडूनची ही माहिती जाहीर करण्यात आली आहे.

आणखी वाचा : वाहन उद्योगाचा ‘रिव्हर्स गिअर’

निव्वळ नफा घटला
अशोक लेलँड प्रामुख्याने मध्यम आणि अवजड वाहनांची निर्मिती करते. सध्याच्या परिस्थितीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात ४५ ट्क्कांनी घट झाली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात जूनपर्यंत संपलेल्या पहिल्या तिमाहीत कंपनीला २३० कोटींची निव्वळ नफा झाला आहे. पण, गेल्या वर्षी याच काळात ४२१.६३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. देशातील सर्वांत मोठी वाहन उद्योग कंपनी असलेल्या मारुतीने ४ सप्टेंबर रोजी त्यांच्या गुरुग्राम आणि मनेसर प्लँटमध्ये दोन दिवस नॉन वर्किंग डे जाहीर केला होता. त्या दोन्ही दिवसांत कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारचे उत्पादन झाले नाही. टोयोटा कंपनीने त्यांच्या बेंगळुरू प्लँटमधील उत्पादन दोन दिवस थांबवले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hinduja group ashok leyland announcement of non working days after slow down in auto sector