भगवा घालणाऱ्यांनो तुम्ही दहशतवादीच बना; पुलकित महाराजांचं वादग्रस्त विधान, FIR दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pulkit Maharaj

स्वत:ला अध्यात्मिक गुरू म्हणवून घेणाऱ्या पुलकित महाराजांनी एक वादग्रस्त विधान केलंय.

भगवा घालणाऱ्यांनो तुम्ही दहशतवादीच बना; पुलकित महाराजांचं वादग्रस्त विधान

नवी दिल्ली : स्वत:ला अध्यात्मिक गुरू म्हणवून घेणाऱ्या पुलकित महाराजांनी (Pulkit Maharaj) एक वादग्रस्त विधान केलंय. त्यांचं हे विधान सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालंय. सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये पुलकित महाराज भगवा परिधान करणाऱ्यांना दहशतवादी (Terrorist) बनण्याचं आवाहन करताना दिसताहेत. समाजवादी पक्षानं त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केलाय.

समाजवादी पार्टीनं (Samajwadi Party) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पुलकित महाराज म्हणताहेत, जे लोक भगवा परिधान करताहेत, त्यांना आता दहशतवादी बनण्याची गरज आहे. त्यांनी आता दहशतवादीच बनावं, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलंय. समाजवादी पक्षानं हा व्हिडिओ ट्विट करत लिहिलंय, लोकांनी या भगव्या (बनावट) बाबांपासून आणि मठाधिपतींपासून सावध रहावं. या लोकांना कसला समाज घडवायचाय आणि सत्ता टिकवायची आहे, हे तुमच्या लक्षात आलंच असेल. बेरोजगारी, महागाई, निरक्षरता आणि आरोग्य यावरून लक्ष वळवण्यासाठी भाजप सरकारच्या इशार्‍यावर ही सर्व भाषणबाजी केली जात आहे, असा आरोप सपानं केलाय.

हेही वाचा: गुणरत्न सदावर्तेंना सातारा पोलिस उचलण्याच्या तयारीत

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या पुलकित महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुलकित महाराज उर्फ ​​पुलकित मिश्राविरुद्ध साहिबाबाद पोलिस ठाण्यात (Sahibabad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आलाय. साहिबाबाद पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक रवी बालियान यांच्या वतीनं हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान, हे तेच पुलकित महाराज आहेत, ज्यांना 2018 साली दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केली होती.

Web Title: Hindus Should Become Terrorists Controversial Statement Of Pulkit Maharaj

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Samajwadi PartyTerrorist