गुणरत्न सदावर्तेंना सातारा पोलिस उचलण्याच्या तयारीत; ताबा मिळवण्यासाठी मुंबईत ठोकला तळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gunaratna Sadavarte

अ‍ॅड. सदावर्ते यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल असल्याची खात्रीशीर माहिती आहे.

गुणरत्न सदावर्तेंना सातारा पोलिस उचलण्याच्या तयारीत

सातारा : अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात (Satara City Police Station) जुना गुन्हा दाखल असल्यानं त्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना मुंबईतून ताब्यात घेण्यासाठी तळ ठोकून आहेत. सातारा पोलिसांनी सकाळपासूनच फिल्डिंग लावली आहे. मात्र, मुंबईतील न्यायालय (Mumbai Court) काय निर्णय देणार त्यावर पुढील बाबी अवलंबून आहेत. दरम्यान, खासदार शरद पवार यांच्या निवासस्थानावरील हल्ल्याप्रकरणी सध्या सदावर्ते यांचा ताबा मुंबई पोलिसांकडं आहे.

हेही वाचा: सौदी अरेबियानं 15 वर्षांनंतर 'रमजान'साठी बदलले नियम

दोन वर्षांपूर्वी साताऱ्यातील फलटण तालुक्यात (Phaltan taluka) एक गुन्हा दाखल असल्याची खात्रीशीर माहिती आहे. अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल असून मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) अनुषंगानं एका वृत्तवाहिनीवर त्यांनी बेताल वक्तव्य केलं होतं. तेढ निर्माण होईल, असं वक्तव्य झाल्यानं याप्रकरणी एका तक्रारदारानं शहर पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली होती, अशी प्राथमिक माहिती आहे. राजेंद्र बाबुराव निकम (रा. तारळे, ता. पाटण) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली होती, असं कळतंय.

‘सिल्व्हर ओक’ हल्लाप्रकरणी दोन दिवस पोलीस कोठडीत असलेले एसटी कामगारांचे वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी आज संपत असल्याने कोर्टात आणण्यात आले आहे. मात्र, आता नवा ट्विस्ट आला आहे. सातारा पोलीस कोर्टात दाखल झाले असून फलटण येथील एका प्रकरणात सदावर्ते यांचा ते ताबा मागण्याची शक्यता आहे. सदावर्ते यांच्या विरोधातील राज्यभरातील प्रकरणे तपासली जाणार असल्याचेही समजते.

हेही वाचा: 'शरद पवारांच्या घरावरील हल्ला म्हणजे, महाराष्ट्राच्या अस्मितेवरचा हल्ला'

सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टाकडे सदावर्ते यांची पोलीस कोठडी वाढवून मागितली आहे. या घटनेतील चार आरोपी अजूनही ताब्यात आलेले नाही. त्यांना ताब्यात घ्यायचे आहे. तसेच आरोपीला जे फोन आले होते त्याची माहिती आरोपी देत नाहीत, ते कोणत्याही प्रकारची माहिती देत नसल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. हल्ल्याच्या दिवशी सदावर्ते यांना कॉल आला होता, त्याची माहिती घ्यायची आहे. तेव्हा पोलीस कोठडी वाढवून द्या, असे सरकारी वकिलांनी सांगितले आहे. साताऱ्यात वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात मराठा आरक्षणाच्यासंदर्भातील एक गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी त्यांची पोलीस कोठडी सातारा पोलिसांकडून मागण्यात येण्याची शक्यता आहे.

Web Title: Satara Police Arrived In Mumbai To Arrest Gunaratna Sadavarte

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top