MP Nagesh Patil Ashtikar
esakal
हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी पीक नुकसानीची पाहणी केली.
पंचनाम्यात दिरंगाई होऊ नये, वस्तुनिष्ठ पद्धतीने काम करावे असे त्यांनी सांगितले.
स्थानिक कर्मचारी काम करत नसतील तर कठोर कारवाईचा इशारा खासदारांनी दिला.
हिंगोली : पीक नुकसानीच्या (Hingoli Crop Loss) पंचनाम्यामध्ये दिरंगाई होता कामा नये, आपसात वाद घालण्याऐवजी वस्तुनिष्ठ पंचनामे कसे होतील याकडे लक्ष द्या, स्थानिक कर्मचारी काम करीत नसेल, तर त्यांच्या हाताला धरून काम करून घेऊ, कोणी ऐकत नसेल तर कानाखाली वाजवू, असा इशारा खासदार नागेश पाटील आष्टीकर (MP Nagesh Patil Ashtikar) यांनी दिला.