Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

यामध्ये महिलांनी ऑर्डर केलेलं पेय, जेवणाचं बिल आणि सेवेची किंमत संबंधित पुरुष ग्राहकाच्या नावावर फाडलं जातं.
pub
pub

हैदराबाद : आपल्याकडं पब संस्कृती वारंवार टीकेची झोड उठवली जाते. याला पाठबळ देणारी एक धक्कादायक घटना एका पबमध्ये घडली आहे. या ठिकाणी चक्क पुरुषांना भूरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हैदराबाद शहरात हा प्रकार घडला आहे. शहर पोलिसांच्या टास्कफोर्सनं या ठिकाणी छापा टाकल्यानंतर ही बाब समोर आली आहे. (hires women to seduce men in Hyderabad pub police task force raided)

pub
Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटलं की, रविवारी रात्री पोलिसांनी संबंधित पबसह इतर काही ठिकाणी अचानक छापेमारी केली. यावेळी तिथं धक्कादायक बाब समोर आली. यामध्ये पबच्या व्यवस्थापनानं 32 महिलांना इथं येणाऱ्या पुरुषांना अश्लिल कृत्यांसाठी भुरळ पाडण्यासाठी कामावर ठेवल्याचं आढळलं. या महिला पुरुष ग्राहकांकडून पैसे उकळण्यासाठी 'अश्लील कृत्ये' करत होते. (Marathi Tajya Batmya)

pub
Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

टास्क फोर्सच्या डीसीपी रश्मी पेरुमल म्हणाल्या, “पबच्या व्यवस्थापनानं महिलांच्या प्रतिष्ठेविरोधात कृती केली आणि आर्थिक फायद्यासाठी त्यांना लैंगिक कृत्ये करण्यास भाग पाडलं. त्याचबरोबर पब आयोजकांनी परवानगी असलेल्या आवाज मर्यादांचं देखील उल्लंघन केलं होतं. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन महिन्यांपासून हा अश्लील कृत्यांचा प्रकार इथं सुरु होता. (Latest Marathi News)

या पबमध्ये देशाच्या विविध भागांतील महिला कामाला होत्या. यामध्ये महिलांनी ऑर्डर केलेलं पेय, जेवणाचं बिल आणि सेवेची किंमत संबंधित पुरुष ग्राहकाच्या नावावर फाडलं जातं,” असही पोलिसांनी सांगितलं. अलिकडेच पोलिसांनी बेगमपेठ इथला उर्वशी बार आणि रेस्तराँ देखील याच कारणासाठी बंद केलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com