'त्यांच्या पूर्वजांनीही RSSवर बंदी घालण्याचा प्रयत्न केला; राहुल गांधींवर होसबळेंची टीका | his ancestors also tried to ban rss dattatreya hosabale on rahul gandhis statement | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi And RSS

Rahul Gandhi : 'त्यांच्या पूर्वजांनीही बंदी घालण्याचा प्रयत्न केला; राहुल गांधींवर RSSची टीका

नवी दिल्ली - काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी लंडनमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल केलेल्या विधानवरून राजकारण तापलं आहे. आता आरएसएसने राहुल गांधी यांच्या विधानचा समाचार घेतला आहे. राहुल यांच्या विधानामुळे संसदेच्या बजेट सत्रात गदारोळ सुरू आहे.

सत्ताधारी भाजपच्या मते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावर माफी मागावी. तर काँग्रेसने राहुल गांधी यांचं विधान चुकीचं नसल्याचं म्हटलं.

हरियाणातील समालखा येथे अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबळे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, राहुल गांधी यांच्या पूर्वजांनीही संघावर बंदी घालण्याचा प्रयत्न केला. मला त्यांना एवढेच सांगायचे आहे की, त्यांनी थोडे जबाबदारीने बोलावे. आणीबाणीच्या काळात मीही तुरुंगाती होतो. ज्यांनी देशाला तुरुंग बनवले त्यांनी आजतागायत माफी मागितली नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

ते पुढं म्हणाले की, पुढील पिढीच्या कार्यकर्त्यांना लवकर नेतृत्व द्यायचे आहे. सामाजिक सलोखा, कौटुंबिक जागृती, पर्यावरण, स्वदेशी विचार आणि नागरी कर्तव्य हे पाच सामाजिक धोरणं अमृत महोत्सवाच्या निमित्ताने नव्या पिढीला द्यावे लागेल.आता संघाच्या शाखांमधील जागांची संख्या ९.५ टक्क्यांनी वाढल्याचंही त्यांनी सांगितलं.