‘एमएसपी’मध्ये ऐतिहासिक वाढ : नरेंद्र मोदी

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 26 February 2021

शेतकऱ्याला मिळणाऱ्या हमीभावात (एमएसपी) ऐतिहासिक वाढ करण्याचा सन्मान आमच्या सरकारला मिळाला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले. त्याचबरोबर सर्व पीकांसाठी एमएसपीच्या हमीसाठी स्वतंत्र कायदा करण्याची आंदोलक शेतकऱ्यांची मागणी आपल्या सरकारला मान्य नसल्याचेही त्यांनी सूचित केले.

नवी दिल्ली - शेतकऱ्याला मिळणाऱ्या हमीभावात (एमएसपी) ऐतिहासिक वाढ करण्याचा सन्मान आमच्या सरकारला मिळाला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले. त्याचबरोबर सर्व पीकांसाठी एमएसपीच्या हमीसाठी स्वतंत्र कायदा करण्याची आंदोलक शेतकऱ्यांची मागणी आपल्या सरकारला मान्य नसल्याचेही त्यांनी सूचित केले. देशातील प्रत्येक नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत वार्षिक ६ हजार रुपयांचे अनुदान थेट पोहोचविणाऱ्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेला बुधवारी  दोन वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त मोदींनी ट्विट करून एमएसपीबाबतचा दावा केला. वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमांवर गेल्या ९२ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी एमएसपी कायदा करण्याची मागणी लावून धरली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मात्र मोदींनी, एमएसपीमध्ये आम्ही ऐतिहासिक वाढ केल्याचे वास्तव सांगितले. त्यांनी काल सलग केलेल्या ट्विटस्‌मध्ये म्हटले की अन्नदात्याचे जगणे सुलभ करण्यासाठी व त्याचे उत्पन्न दुप्पट करण्याचा जो संकल्प देशाने केला आहे त्यात पीएम किसान सन्मान योजनेचा वाटा महत्त्वाचा राहिलेला आहे.

भारतीय रेल्वेची कमाल; काश्मीरमध्ये चिनाब नदीवर उभारला आयफेल टॉवरपेक्षाही उंच पूल

अन्नदात्याच्या कल्याणाला समर्पित असलेल्या या योजनेमुळे कोट्यवधी शेतकरी बंधुभगिनींच्या जीवनात जे बदल घडले त्यामुळे आमचा उत्साह वाढला आहे. आज आमचे शेतकरी आत्मनिर्भर भारत मोहिमेचा अविभाज्य भाग बनले आहेत. आमचे सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी काहीही करण्यास तयार आहे, असेही मोदी यांनी म्हटले आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Historical rise in MSP Narendra Modi