War Hero : परदेशी युद्धभूमीवर ३ वर्ष सेवा करणारे भारतीय कर्नल कोरियाचे हिरो बनले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

war news

War Hero : परदेशी युद्धभूमीवर ३ वर्ष सेवा करणारे भारतीय कर्नल कोरियाचे हिरो बनले

पुणे : मित्र संकटात असल्यावर त्याच्या मदतीला धावून जाणे ही तर आपली संस्कृती आहे. जगभरात कोठेही संकट येऊदेत आपण त्यांच्या मदतीला उभे राहतोच. भारतीय स्वर्गीय लेफ्टिनंट कर्नल डॉ. ए जी रंगराज यांनी देखील असेच कतृत्व गाजवले आहे. त्यांनी तब्बल ३ वर्ष २ महिने दक्षिण कोरियात राहून जवानांचे प्राण वाचवले आहेत. दक्षिण कोरियाने २०२० मध्ये त्यांना 'वॉर-हीरो' किताब बहाल केला आहे.

दक्षिण कोरियाच्या २ लाख सैनिकांचे प्राण वाचवल्यावबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सन्मान करण्यात आला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर कोरियाचे दक्षिण आणि उत्तर कोरियाच्या फाळणीनंतर युद्ध झाले होते. त्या युद्धाला आता 72 वर्ष पुर्ण झाली. या युद्धात रंगराज यांनी दक्षिण कोरियाच्या २ लाख सैनिकांचे प्राण वाचवले होते. आज जाणून घेऊयात डॉ. रंगराज यांची गोष्ट.

ए जी रंगराज यांचा जन्म 1917 मध्ये तामिळनाडू येथील अरकोट शहरात झाला. त्यानंतर 1930 मध्ये त्यांनी मद्रास मेडिकल कॉलेजमधून मेडीकलचे शिक्षण घेतले. रंगराज 1941 मध्ये इंडियन मेडिकल सर्व्हिसमध्ये जॉईन झाले. त्यांनी मेरठमध्ये लष्करी प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यांनंतर रंगराजची मेरठच्या जनरल हॉस्पिटलमध्ये नियुक्ती झाली.

डॉ.रंगराज हे भारतीय पॅरा बटालियनमध्ये मेडीकल ऑफिसर होते. दुसऱ्या महायुद्धात मणिपूर मोर्चात सहभाग घेतल्याबद्दल त्यांना 60 व्या पॅराशूट फील्ड अॅम्ब्युलन्स युनिटमध्ये बढती मिळाली.

दुसऱ्या महायुद्धानंतर कोरियाचे दक्षिण आणि उत्तर कोरियात विभाजन झाले. ज्यामध्ये उत्तर आणि दक्षिण कोरियामध्ये युद्धजन्य परीस्थिती निर्माण झाली होती. तर त्याच वेळी सोव्हिएत युनियन आणि यूनाइटेड स्टेट्स यांच्यात शांततापूर्ण युद्ध सुरू झाले होते. त्यावेळी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याक़डे परराष्ट्र व्यवहार खाते होते.

त्यावेळी दक्षिण कोरियाला परराष्ट्र सैन्याच्या मदतीची गरज होती. ज्यासाठी यूनाइटेड नेशन्सने उत्तर कोरियाच्या विरोधात इतर मित्र राष्ट्रांकडे मदत मागितली. पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपले 60 पॅराशूट फील्ड अॅम्ब्युलन्स युनिट दक्षिण कोरियाच्या मदतीसाठी पाठवले.

दक्षिण कोरियाच्या युद्धभुमीवर डॉ.रंगराज यांच्या नेतृत्वाखालील 346 जवानांच्या टीमने 27 व्या कॉमनवेल्थ ब्रिटीश ब्रिगेडला वैद्यकीय सेवा पुरवली. या युद्धात चीन आणि अमेरिकेसह अनेक देशांनी भाग घेतला होता. यापैकी काही देश उत्तर कोरियाच्या तर काही देश दक्षिण कोरियाच्या बाजूने होते. डॉ.रंगराज यांच्या टीमवर चीनने हल्ला केला.

रेल्वे थांबवली नसती तर...

वाहतुकीची कोणतीही सोय नसताना भारतीय लष्कराने तिथून निसटण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. शेवटी वाफेच्या रेल्वेमध्ये बसून सर्व टीम मार्गस्थ झाली. पण रंगराज यांनी टीमला मध्येच उतरण्याचे आदेश दिले. सेऊल आणि हान नदीदरम्यान जोडणारा पूल चीनच्या सैन्याने नष्ट केला होता. याची जाणिव झाल्यावर क्षणाचाही विलंब न करता रेल्वे थांबवण्यात आली.

यानंतर पुर्ण टीमने पुन्हा युद्धभूमी गाठत कडाक्याच्या थंडीतही जखमींवर उपचार केले. हाडे गोठवणाऱ्या थंडीतही फक्त चहा आणि बिस्किट खाऊन भारतीय लष्कराने 103 अमेरिकन सैनिकांवर शस्त्रक्रिया केली. त्यानंतर त्यांनी कोरियन डॉक्टर आणि परिचारिकांनाही प्रशिक्षण दिले. युद्धानंतर रंगराज यांची टीम भारतात परतली. ३ वर्ष त्या युद्धभुमीत घालवल्यानंतर रंगराज यांना परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले.

Web Title: History Of India Dr Rangaraj Declared Hero Of The Month By Korean Ministry

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IndiaWarMilitaryHistory