History of Teachers' Day: शिक्षक दिनाचा नेमका इतिहास काय आहे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

History of Teachers' Day

History of Teachers' Day: शिक्षक दिनाचा नेमका इतिहास काय आहे?

आज 5 सप्टेंबर म्हणजे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा स्मृतिदिन. हा दिवस आपल्या भारतात ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. 5 सप्टेंबर 1888 रोजी डॉ. राधाकृष्णन यांचा जन्म झाला. डॉ. राधाकृष्णन हे एक शिक्षक होते तसेच ते भारताचे दुसरे राष्ट्रपती ही होते. त्यांचा स्मृतिदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

आजच्या दिवशी शिक्षकांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला जातो. शिक्षकांचा सन्मान करण्याची ही परंपरा जुनी आहे.

शिक्षक म्हणजे तरी काय?

शि म्हणजे शिल

क्ष म्हणजे क्षमा

क म्हणजे कला

ज्याच्याकडे शिल, क्षमा आणि कला याचा त्रिवेणी संगम आहे तो म्हणजे शिक्षक

हेही वाचा: ढिंग टांग :  आमचा शिक्षक दिन!

या दिवशी विद्यार्थी शिक्षकांप्रती कृतज्ञता म्हणून विविध कार्यक्रम आयोजित करतात. तसेच आपल्या संस्कृतीत आईनंतर दुसरं महत्त्वाचं स्थान असतं ते गुरूला. आपल्या जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरूचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळेच आपल्याकडे शिक्षक दिनाला विशेष महत्त्व आहे. व्यक्ती आणि समाजाच्या विकासात शिक्षणाचा वाटा मोलाचा आहे. जिथे शिक्षण आहे तिथेच विकास आहे, म्हणूनच शिक्षणातून व्यक्तीची जडणघडण करणाऱ्या शिक्षकाचा आदर करण्याचा हा दिवस असतो.

चला तर मग जाणून घ्या शिक्षक दिनाचा इतिहास

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन एक उत्तम शिक्षक होते ज्यांनी आपल्या आयुष्यातील 40 वर्षे अध्यापनाच्या व्यवसायात वाहिले. ते विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांच्या योगदानासाठी आणि भूमिकेसाठी प्रसिद्ध होते. म्हणूनच शिक्षकांविषयी विचार करणारे आहेत. एकदा त्यांचे विद्यार्थी आणि मित्रांनी त्यांना सांगितले की ते त्यांचा वाढदिवस साजरा करू इच्छितात. त्यावर त्यांनी सांगितले होते, ‘माझा जन्मदिवस वेगळा साजरा करण्याऐवजी शिक्षक दिवस म्हणून साजरा झाला तर मला अभिमान वाटेल.’ हा दिवस 1962 सालापासून शिक्षक दिन म्हणून साजरा होऊ लागला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन विद्वतप्रचुर, व्यासंगी होते. त्यांना तब्बल 27 वेळा नोबेल पुरस्काराचे नामांकन मिळाले होते. 1954 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Web Title: History Of Teachers Day What Is The Exact History Of Teachers Day

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..