१५० वर्षांपासून दोन गावांत का साजरी होत नाही होळी? वाचा कारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhatisgarh Village Not Celebrate Holi
गेल्या १५० वर्षांपासून या गावांत साजरी झाली नाही होळी! धक्कादायक कारण जाणून घ्या!Holi 2022

१५० वर्षांपासून दोन गावांत का साजरी होत नाही होळी? वाचा कारण

होळीचा सण उद्यावर आला आहे. यावर्षी रंग खेळण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. अनेकांनी त्यासाठी तयारीही सुरू केली आहे. पण, भारतात असे दोन जिल्हे आहेत त्यातील गावात गेल्या १५० वर्षांपासून होळीच खेळली गेली नाहीये. छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यात ही दोन गावं वसलेली आहेत. या गावात होळीच्या दिवशी गोडधोड केले जाते पण होलिका दहन आणि गुलाल खेळला जात नाही.

हेही वाचा: Holi ला भांग प्यायल्यानंतर काय काळजी घ्याल? 'या' टिप्स फॉलो करा

ही आहेत २ गावं

जिल्ह्यातील पहिले गाव खरहरी हे कोरबा जिल्ह्यापासून ३५ किलोमीटर दूर आहे. ते मां मडवारानी मंदिराच्या जवळ असलेल्या डोंगराखाली वसलेले आहे. या गावात गेल्या १५० वर्षांपासून होळी न खेळण्यामागे गावातले वडिलधारे व्यक्ती सांगतात की, त्यांच्या जन्माच्या आधीपासूनच गावात होळी न खेळण्याची प्रथा आहे. या गावात ६५० ते ७५० लोकं राहतात.

हेही वाचा: Holi 2022 : होळी खेळताना जपा डोळे! या पाच गोष्टी लक्षात ठेवा

गावातल्या लोकांचे झाले नुकसान

गावातल्या वडिलधाऱ्या व्यक्तींच्या मते, अनेक वर्षांपूर्वी गावात मोठी आग लागली होती. गावातील परिस्थिती बिकट झाली होती. त्यानंतर गावात साथीचा आजार सुरू झाला होता. त्यामुळे गावातील लोकांचे मोठे नुकसान झाले होते. अशावेळी गावातील एका बैगा (हकीम) च्या स्वप्नात देवी मॉं मदवरानी आली. तिने या बैगाला संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दिला. गावात होळीचा उत्सव कधीही साजरा करू नका, तरच गावात शांतता नांदेल, असा उपाय देवीने दाखवला. त्यानंतर गावात कधीही होळी साजरी झालेली नाही. गावकऱ्यांनी सांगितले की इथे होलिका दहन होत नाही, तसेच रंगही उडवला जात नाही. पण, गोड-धोड मात्र केले जाते.

हेही वाचा: होळी खेळताना Mobile, Gadgets ची अशी घ्या काळजी!

Holi 2022

Holi 2022

दुसऱ्या गावात जाऊन खेळतात होळी

नियम तोडून रंग गुलाल खेळल्यास त्यांच्यावर देवीचा प्रकोप होतो. ते आजारी पडतात, असे आजही लोकं मानतात. त्यांच्या चेहऱ्यावर-शरीरावर मोठ्या प्रमाणात फोड येतात. पूजा केल्यावरच त्रास कमी होते. त्यामुळे गावातील सर्व वयोगटाचे लोकं नियम पाळतात. पण आता ही परंपरा बघता गावातील लोकं दुसऱ्या गावात जाऊन होळी खेळायला लागले आहेत. नवीन लग्न झालेल्यास मुली या काळात माहेरी जाणं पसंत करता. मुलांनाही होळी खेळण्याची भिती वाटत असल्याने ते खेळत नाहीत, असे शिक्षक सांगतात.

हेही वाचा: Happy Holi 2022 : जरा हटके; भारताशिवाय 'या' 8 देशात साजरी होते होळी

दुसऱ्या गावातही अशीच स्थिती

जिल्ह्यातील दुसरे गाव धामणगुडी आहे. ते कोरबापासून 20 किमी अंतरावर आहे.तर, मदवरानीपासून फक्त 5 किमी अंतरावर आहे. या गावातही होलिका दहन गेल्या दीडशे वर्षांपासून झालेले नाही. या गावातही एक आख्यायिका आहे की होळी खेळल्याने गावातील देव कोपतात. दोन्ही गावांचे अंतर अवघे ६ किमी आहे.

Web Title: Holi Is Not Celebrated In Two Villages Near Chattisgarh Read The Reason

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Holivillage