Holi ला भांग प्यायल्यानंतर काय काळजी घ्याल? 'या' टिप्स फॉलो करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bhang in holi
Holi ला भांग प्यायल्यानंतर काय काळजी घ्याल? या टिप्स फॉलो करा

Holi ला भांग प्यायल्यानंतर काय काळजी घ्याल? 'या' टिप्स फॉलो करा

होळी सुरू व्हायला जेमतेम आठवडा उरला आहे. यावर्षी निर्बंध शिथील झाल्याने होळी साजरी करण्यासाठी लोकं उत्सुक आहेत. रंग लावण्याचा जसा लोकांना उत्साह असतो तसेच अनेकांना भांग प्यायलाही आवडते. पण जे पहिल्यांदा भांग पिणारे आहेत त्यांना भांग प्यायल्यानंतर काय होतं हे माहिती नसतं. त्यामुळे अशा लोकांनी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्ही भांग प्यायल्यानंतर काही गोष्टी खाताना काळजी घ्या. नाहीतर त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा: Amazonच्या होळी स्पेशल स्टोअर मधून मिळणार ७० ते ४० टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट

जास्त खाऊ नका

जास्त खाऊ नका

या गोष्टी लक्षात ठेवा

जास्त खाऊ नका - भांग प्यायल्यानंतर लोकांना जास्त भूक लागते. पण अशावेळी तुम्हाला संयम ठेवणे गरजेचे आहे. तुम्ही मर्यादित प्रमाणात कुठलाही पदार्थ खाल्ला पाहिजे. अतीप्रमाणात पदार्थ खाल्लेत तर तुम्हाला अपचन, पोट खराब होणे अशा काही समस्या येऊ शकतात.

औषध घेऊ नका- भांग प्यायल्यानंतर अनेकांना नशा चढते. लोक शुद्धीत नसतात. त्यामुळे काही जण नशा उतरविण्यासाठी किंवा डोकं जड झाल्याने औषध घेतात. पण असे औषध घेणे शरीरासाठी नुकसान करणारे असू शकते.

हेही वाचा: Happy Holi 2022 : जरा हटके; भारताशिवाय 'या' 8 देशात साजरी होते होळी

no Alcoholic

no Alcoholic

मद्यपान करणे टाळा - आरोग्यासाठी मद्यपान तसेही वाईटच असते. तुम्ही भांग प्यायल्यानंतर जर मद्यपान करणार असाल तर तुमच्या आरोग्यावर याचे वाईट परिणाम होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला चक्कर येणे, मळमळ अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

जास्त फिरू नका- भांग प्यायल्यानंतर महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे जास्त फिरायचे नाही. कारण भांगेची नशा हळूहळू चढते. त्यानंतर आजूबाजूच्या गोष्टी नीट लक्षात राहत नाहीत. त्यामुळे तुम्हाला चक्कर येऊ शकते तसेच अपघात होण्याची भिती आहेच.

Web Title: After Taking Bhang In Holi 2022 Festival Celebration Avoid These Four Thing

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Holihealth newsdrink