Holi Liquor Sale: होळीच्या दिवशी झिंगण्यात दिल्लीकरांचा विक्रम! रिचवली तब्बल 'इतक्या' कोटींची दारु

एकाच दिवसात तब्बल 'इतक्या' बाटल्यांची झाली विक्री
banned meat and liquor sales in MP
banned meat and liquor sales in MPesakal

नवी दिल्ली : देशभरात यंदा होळीचा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा झाला. या दिवशी खरंतर दिल्लीत ड्राय डे असतो त्यामुळं लोकांनी आधीच दारुचा जुगाड करुन ठेवला होता. कारण माध्यमातील वृत्तांनुसार, दिल्लीत होळीच्या दिवशी दारुच्या विक्रीनं मागचे सर्व रेकॉर्ड तोडून टाकले. ६ मार्च रोजी एकाच दिवशी ५८.८ कोटी रुपयांची २६ लाख बाटल्या दारुची विक्री झाली. (Holi Liquor Sale Record worth 60 crores Liquor was sold on occasion of Holi)

banned meat and liquor sales in MP
BJP leaders Quit Party: भाजपच्या आयटी सेलमधील 13 नेत्यांचा पक्षाला रामराम!

दिल्लीच्या अबकारी विभागानं या महिन्यात २२७ कोटी रुपयांची १.१३ कोटी दारुच्या बाटल्या विकल्या. सोमवारपर्यंत (६ मार्च) विकली गेलेली पण अधिकाऱ्यांना ७ मार्चला २० लाख बाटल्यांची विक्री होईल असा अंदाज आहे. दिल्ली सध्या ५६० दारुची दुकानं आहेत. इतर दिवशी जेव्हा दररोज १२ ते १३ लाख दारुच्या बाटल्या विकल्या जातात. त्यात होळीच्या निमित्त शनिवार, रविवार आणि सोमवारी दारुच्या विक्रीचे आकड्यांमध्ये वाढ होऊन तो १५ लाख, २२ लाख आणि २६ लाख दररोजची विक्री इथपर्यंत पोहोचली.

banned meat and liquor sales in MP
Maharashtra Economic Survey 2022-23: आर्थिक सर्वेक्षण अहवाल जाहीर; 'असा' राहिल राज्याचा विकास दर

यावर्षी दिल्लीनं दारुच्या विक्रीतून ६,१०० कोटी रुपयांचा महसूल गोळा केला. या महसुलात दारुच्या बाटल्यांवरील उत्पादन शुल्क ५,००० कोटी रुपये आणि व्हॅटच्या रुपात १,१०० कोटी रुपयांचा समावेश आहे. तर ९६० हॉटेल्स, रेस्तराँ आणि क्लब्समध्ये दारुच्या विक्रीमुळं जमा झालेल्या महसुलाच्या डेटाचा समावेश केलेला नाही.

सर्वात जास्त या ब्रँडची झाली विक्री

दिल्लीतील दारुच्या दुकानदारांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकांनी जास्त करुन व्हिस्की, व्होडका आणि स्कॉच या दारुच्या प्रकारांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. वातावरणात उष्णता असल्यानं काही जणांनी बिअर देखील खरेदी केल्या. बहुतेक जणांनी ४०० ते १००० रुपयांपर्यंतच्या दारुची खरेदी केली. खूपच महाग असलेल्या दारुची जास्त विक्री झालेली नाही, पण दिवाळीच्या काळात अशा महागड्या दारुची मोठ्या प्रमाणावर विक्री होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com