esakal | पंतप्रधान मोदी हुकूमशाह आहेत? अमित शाह म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

PM Narendra Modi

PM मोदी हुकूमशाह आहेत? अमित शाह म्हणाले...

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी सत्तेत २० वर्ष पूर्ण केले. त्यानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home minister Amit Shah) यांनी सरकारी वृत्त वाहिनी संसद टीव्हीला एक मुलाखत दिली. यावेळी शाह यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्व गुणांपासून तर त्यांच्यावर होणाऱ्या टीकेबाबत अनेक प्रश्नांचे उत्तरं दिली. पंतप्रधान मोदींवर हुकूमशाहीचे आरोप लावले जातात. याबाबतही शाह यांना प्रश्न विचारण्यात आला होता.

हेही वाचा: मोदी सरकारनं शेतकरी आंदोलकांना देशोधडीला लावलं; काँग्रेसचा घणाघात

''पंतप्रधान मोदी यांनी प्रशासनातील लहान-लहान गोष्टी जाणून घेतल्या. गुजरातमध्ये भाजपची स्थिती चांगली नव्हती त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पक्षाला साथ दिली. पक्षाला नव्याने उभारी दिली, असे शाह म्हणाले. मोदी यांच्यावर नेहमी हुकूमशाहीचे आरोप केले जातात. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, मोदी सर्वांचं ऐकतात. प्रत्येक व्यक्तीकडून लहान-लहान गोष्टींबाबत सल्ले घेतात. त्यानंतर निर्णय घेतात.''

मोदी हुकूमशाहीवर विश्वास ठेवतात?

मोदींना हुकूमशाहीबाबत काय वाटतं? असा प्रश्न विचारला असता हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. मी मोदींसारखा दुसरा श्रोता बघितला नाही. कुठली बैठक असेल तर स्वतः कमी बोलतात. मात्र, बैठकीत उपस्थित सर्वांचे ऐकतात. त्यानंतर कुठलाही निर्णय घेतात. आम्हाला कधी-कधी वाटते की, मोदी कशाला इतका विचार करतात. पण, ते सर्वांच ऐकून सर्वांकडून लहान-लहान गोष्टींवर मत जाणून घेण्याला महत्व देतात. त्यामुळे मोदी हुकूमशाहीसारखे निर्णय थोपवतात, असं म्हणणे चुकीचे आहे.

मोदींबद्दल अशा चुकीच्या अफवा पसवरल्या जातात. बैठकीमध्ये झालेली चर्चा बाहेर येत नाही. त्यानंतर सर्वांना वाटतं की निर्णय मोदींनी घेतला आहे. मात्र, हा निर्णय सामूहिक विचारमंथन करून घेतलेला असतो. तसेच निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना जनतेने दिला आहे. त्यामुळे ते निर्णय घेतीलच. पण, सर्वांचे मत ऐकून हे निर्णय घेतले जातात, असेही शाह म्हणाले. आमच्या विचारधारेच्या विरोधात असलेले काहीजण सत्य जनतेपर्यंत पोहोचू देत नाही. खोट्या गोष्टी जनतेला सांगून मोदींची बदनामी करतात, असा आरोपही शाह यांनी केला.

loading image
go to top