
Amit Shah
Sakal
जगदालपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी पुन्हा एकदा नक्षलवाद्यांसोबत चर्चा करायला स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. ‘केंद्र सरकारच्या पुनर्वसन धोरणाचा स्वीकार केल्यानंतर त्यांना शस्त्रत्याग करावाच लागेल,’ असे त्यांनी निर्धारपूर्वक सांगितले.