Amit Shah: दहशतवादाचा संबंध कोणत्याही धर्माशी जोडता कामा नये; गृहमंत्र्यांचं विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gujarat Assembly Elections Amit Shah

Amit Shah: दहशतवादाचा संबंध कोणत्याही धर्माशी जोडता कामा नये'; गृहमंत्र्यांचं विधान

नवी दिल्ली - टेरर फंडिंग दहशतवादापेक्षाही मोठा धोका आहे, असे सांगत याचा संबंध कोणत्याही धर्माशी, राष्ट्रीयत्वाशी किंवा गटाशी जोडला जाऊ नये, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

हेही वाचा: Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी बोगस तक्रारदार उभा केला; सोमय्यांचा खळबळजनक आरोप

राजधानीतील हॉटेल ताज पॅलेस येथे दहशतवादविरोधी वित्तपुरवठ्यावरील 'नो मनी फॉर टेरर' या विषयावरील तिसऱ्या मंत्रीस्तरीय परिषदेला संबोधित करताना शहा म्हणाले की, दहशतवाद्यांना संरक्षण देणे म्हणजे दहशतवादाला प्रोत्साहन देणे. ही सर्व देशांची सामूहिक जबाबदारी आहे की अतिरेकी घटक आणि अतिरेकाला पाठबळ देणाऱ्या देशांना रोखणे.

हेही वाचा का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

शहा म्हणाले की, दहशतवादी सतत हिंसा करण्यासाठी, तरुणांना कट्टरतावादी बनवण्यासाठी आणि आर्थिक संसाधने वाढविण्यासाठी प्रयत्न करतात. तसेच सायबर गुन्हेगारीच्या साधनांचा वापर करून आणि आपली ओळख लपवून कट्टरतावाद पसरविण्याचं काम करतात.

हेही वाचा: Gujarat Election: गुजरातमध्ये देवेंद्र फडणवीसांचा करिष्मा दिसेल का?; बिहार, गोव्यात दिसली होती चुणूक

दरम्यान दहशतवाद हा जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी सर्वात मोठा धोका आहे. परंतु माझा असा विश्वास आहे की दहशतवादाला वित्तपुरवठा करणे दहशतवादापेक्षा अधिक धोकादायक आहे कारण अशा प्रकारच्या वित्तपुरवठ्यामुळे दहशतवादाला पाठबळ मिळतं. शिवाय दहशतवादाला अर्थपुरवठा केल्याने जगातील देशांची अर्थव्यवस्था कमकुवत होते,' असेही अमित शहा म्हणाले.

टॅग्स :BjpAmit Shah