esakal | प. बंगालमध्ये दलित कुटुंबासोबत शहांचं भोजन; तृणमूल म्हणाले हा तर पॉलिटीकल स्टंट
sakal

बोलून बातमी शोधा

amit shaha

तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी म्हटलं की, सगळ्यांना माहीतीय की हा एक  पॉलिटीकल स्टंट आहे.

प. बंगालमध्ये दलित कुटुंबासोबत शहांचं भोजन; तृणमूल म्हणाले हा तर पॉलिटीकल स्टंट

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

गृहमंत्री अमित शहा बुधवारी आपल्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी पश्चिम बंगालमध्ये आहेत. पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शहा बंगालच्या दौऱ्यावर आहेत. पक्षाने हे आधीच स्पष्ट केलंय की अमित शहा हेच पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करतील. अमित शहा याआधी एक मार्च रोजी पश्चिम बंगालला आले होते. शहा हे बांकुडा जिल्ह्यातील चतुर्धी गावातील एका दलित कुटुंबासोबत दुपारचे जेवण करणार आहेत. 

आज बुधवारी शहा कोलकात्यातच राहणार आहेत. ते आज सर्वांत आधी बांकुडा जाणार आहेत जिथे ते पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत आणि समाजातील वेगवेगळ्या नेत्यांसोबत बैठक करणार आहेत. शहा पश्चिम बंगालच्या दक्षिण भागातील 70 विधानसभेच्या जागांसाठी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करतील. यासोबत शहा हे बांकुडा जिल्ह्यातील चतुर्धी गावातील एका दलित कुटुंबासोबत दुपारचे जेवण करणार आहेत. 

हेही वाचा - व्याजावर व्याजापासून अखेर सुटका; बँकांनी पैसे खात्यात टाकायला केली सुरवात

शुक्रवारी शहा मटुआ जातीच्या एका कुटुंबासोबत जेवण करणार आहेत. मटुआ हा समाज पूर्व पाकिस्तानमधून येतो. त्यांची मागणी सुधारित नागरिकत्व कायद्याअंतर्गत नागरिकत्व मिळण्याची आहे. या समुदायाने 2019 साली भाजपाला मत दिले होते. एका मटुआ कुटुंबासोबत जेवण करुन ते हे दाखवू इच्छित आहेत की त्यांचं या समाजाच्या मागणीकडे लक्ष आहे तसेच ते बंगालच्या निवडणुकीत सीएएच्या मुद्याला मध्यवर्ती ठेवू इच्छित आहेत.

हेही वाचा - आणीबाणी 2.0 मध्ये सहर्ष स्वागत; दिल्लीत महाराष्ट्र सदनासमोर भाजपनं लावलं पोस्टर
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या कायद्याला मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता. तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी म्हटलं की, सगळ्यांना माहीतीय की हा एक  पॉलिटीकल स्टंट आहे. अमित शहा यांनी याआधी देखील दलित परिवारासोबत आणि नंतर 2016 मध्ये एका आदिवासी कुटुंबासोबत जेवण केलं होतं. मला नाही वाटत की त्यांच्या या दौऱ्यात काही खास आहे. भाजपाला बंगालमध्ये कलम 356 ची मागणी करण्यासाठी संधी मिळण्याशिवाय बाकी काहीही या दौऱ्यात नाहीये. 
त्यांनी म्हटलं की, या मुद्यावर भाजपात देखील मतभेद आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष याविरोधात आहेत. अमित शहा बहुतेक स्थानिक नेत्यांना समजवायला आलेत. मात्र, भाजपाने पक्षात सगळं काही आलबेल असल्याचा दावा केला आहे.