Ministry of Home Affairs
Ministry of Home Affairs

गृहमंत्रालयाकडून ‘टॉप टेन’ पोलिस ठाणे यादी जाहीर; वाचा कोणाला कोणते स्थान

Published on

नवी दिल्ली - केंद्र सरकारने सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या देशातील दहा पोलिस ठाण्याची निवड केली आहे. यात मणिपूरच्या थौबल जिल्ह्यातील नोंगपोक सेकमई पोलिस ठाण्याने अव्वल स्थान पटकावले आहे. त्यानंतर तमिळनाडूतील सालेम शहरातील एडब्ल्यूपीएस सुरामंगलम पोलिस ठाणे आणि अरुणाचल प्रदेशच्या चांगलांगमधील खारसांग पोलिस ठाण्याचा क्रमांक लागतो. या क्रमवारीत महाराष्ट्रातील एकाही पोलिस ठाण्याचा क्रमांक नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वर्ष २०२० साठी देशातील १६७७१ पोलिस ठाण्यापैकी आघाडीच्या दहा पोलिस ठाण्यांची निवड करण्यात आली. या क्रमवारीत छत्तीसगड, गोवा, अंदमान आणि निकोबार, सिक्कीम, उत्तर प्रदेश, दादरा व नगर हवेली आणि तेलंगणमधील पोलिस ठाण्यांचा समावेश आहे.  कोरोनाकाळातही चांगली कामगिरी करणाऱ्या पोलिस ठाण्याचे सर्वेक्षण करण्यात आले.

निवडीचे आधार

  • मालमत्ताविषयीचे गुन्हे, महिलांविषयीचे गुन्हे , अनोळखी मृतदेहाची ओळख पटवणे आणि कमकुवत वर्गातील लोकांशी निगडित गुन्ह्यांचा निपटारा करताना केलेली कामगिरी.
  • पोलिसांच्या कामगिरीचे मूल्यांकन आणि पोलिस व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आदी १९ निकषांवर पडताळणी दहा ठाण्याची अशी केली निवड.

साधनसामग्रीची उपलब्धता ही बाब महत्त्वाची असली तरी पोलिस कर्मचाऱ्यांचे कर्तव्य आणि प्रामाणिकपणा ही बाब त्याहून अधिक मोठी गोष्ट आहे. 
- अमित शहा, गृहमंत्री

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com