Video: 'जर लव्ह जिहाद कराल, तर...'; मुख्यमंत्र्यांनी दिला कडक इशारा

वृत्तसंस्था
Thursday, 3 December 2020

उत्तर प्रदेश सरकारने लव्ह जिहादविरोधात विधेयक केल्यानंतर आता मध्य प्रदेशातील भाजपाप्रणीत सरकारनेही इशारा दिला आहे. 

भोपाळ (मध्य प्रदेश) : 'लव्ह जिहाद' जर कोणी केले, तर तुमचा विनाश होईल. सरकार सर्व धर्मांचे आणि जातींचे आहे. पण जर कोणी आमच्या मुलींशी घृणास्पद वर्तन केले, तर फोडून टाकेन, असा धमकीवजा इशारा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिला आहे.

जर एखाद्याने धर्मांतर किंवा लव्ह जिहादसारखे काही केले, तर तुमचा विनाश होईल, असेही म्हटले आहे. मध्य प्रदेशातील भाजपाप्रणीत सरकारने लव्ह जिहादविरोधात मसुदा तयार केला आहे. यामध्ये धर्मांतरणाच्या उद्देशाने लग्न करणार्‍यांना १० वर्ष तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

Farmers Protest: आंदोलनाचा चेहरा बनलेल्या सुखदेव यांनी सांगितलं 'त्या' फोटोमागील सत्य!​

विशेष म्हणजे शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखालील मध्य प्रदेश सरकारने लव्ह जिहाद रोखण्यासाठी धर्म स्वातंत्र्य विधेयक 2020 चा मसुदा तयार केला आहे. या प्रस्तावित कायद्यानुसार, मध्य प्रदेशात धर्म लपवून कुणी मुलींची किंवा महिलेची फसवणूक केल्यास दहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात येईल. एवढेच नाही, तर यास मदत करणार्‍या संस्थेची नोंदणीही रद्द केली जाईल. तसेच अर्ज न करता धर्मांतर करणाऱ्या धर्मगुरुंनाही ५ वर्षांची शिक्षा देखील होणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात हा कायदा मंत्रिमंडळासमोर मांडला जाईल आणि डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात हे विधानसभेत मांडण्यात येईल.

farmer protest live update: शेतकऱ्यांकडून स्वाभिमानी वर्तन; सरकारने दिलेले जेवण नाकारले​

मध्य प्रदेशचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनी नुकतीच पोलिस आणि कायदा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. यावेळी धर्म स्वातंत्र्य अधिनियम 1968 तसेच उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातील कायद्यांविषयी चर्चा झाली. तेव्हा शिक्षा ५ वर्षांवरून १० वर्षांपर्यंत वाढविण्यात येईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. 

गृहमंत्री मिश्रा म्हणाले की, असे विवाह घडवून आणणारे धर्मगुरू, काझी किंवा मौलवी यांना ५ वर्षांची शिक्षा होऊ शकते. धर्मांतर करण्यापूर्वी एका महिना अगोदर माहिती द्यावी लागेल. धर्मांतरण आणि जबरदस्तीने लग्न केल्याबद्दल तक्रार पीडिता, पालक, कुटुंबातील सदस्य किंवा इतर कुणीही करू शकते. हा गुन्हा अजामीनपात्र असेल, असेही मिश्रा यांनी नमूद केले.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan made statement about Love Jihad