
दोन आठवड्यापूर्वी लग्न झाल्यानंतर नवदाम्पत्य हनीमूनसाठी शिलाँगला गेलं होतं. मात्र तिथून २४ मे पासून बेपत्ता झालं आहे. दोघांचं शेवटचं लोकेशन शिलाँगमधील ओसरा हिल इथं होतं. त्याठिकाणी त्यांनी भाड्याने घेतलेली एक्टिव्हा बेवारस स्थितीत आढळून आली. इंदौरच्या नवविवाहित दाम्पत्याचं नाव राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी असं आहे. इंदौरहून ते २० मे रोजी शिलाँगला गेले होते. आता राजा आणि सोनम यांचे नातेवाईक शिलाँगला पोहोचले असून दोघांचा शोध घेतला जात आहे.