
गीता गोपीनाथ यांचा बहुमान; ‘IMF’च्या भिंतीवर झळकले छायाचित्र
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) पहिल्या माजी मुख्य अर्थशास्त्रज्ञ व विद्यमान उपव्यवस्थापकीय संचालक गीता गोपीनाथ यांच्या नावावर आणखी एक विक्रम जमा झाला आहे. ‘आयएमएफ’च्या भिंतीवर लावलेल्या अर्थशास्त्रज्ञांच्या छायाचित्रांच्या रांगेत आता गोपीनाथ यांचीही तसबीर झळकली. हा बहुमान मिळालेल्या त्या पहिला महिला अर्थशास्त्रज्ञ व दुसऱ्या भारतीय आहेत. याआधी हा सन्मान माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना मिळाला आहे.
ही आनंदाची बाब गीती गोपीनाथ यांनीच ट्विटच्य माध्यमातून सांगितली आहे. ‘आयएमएफ’च्या भिंतीवर झळकलेले छायाचित्र शेअर करीत त्यांनी ही माहिती दिली आहे. छायाचित्राबरोबर इमोजी शेअर करीत त्यांनी ‘ब्रेकिंग द ट्रेंड’ असे शीर्षक दिले आहे. ‘माजी अर्थशास्त्रांसह मी आता ‘आयएमएफ’च्या भितींवर झळकले आहे, असे त्यांनी लिहिले आहे. यामध्ये आणखी एक विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यालयातील ज्या भिंतीवर माजी अर्थशास्त्रज्ञांच्या तसबिरी आहेत, त्या आतापर्यंत केवळ पुरुषांचीच छायाचित्रे आहेत. गोपीनाथ यांनी ही परंपरा खंडित करीत या खास भितींवर स्वतःचे नाव कोरले आहे. गीता गोपीनाथ (वय ५०) यांनी २०१९ ते २०२२ या काळात ‘आयएमएफ’च्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून काम केले आहे.
Web Title: Honor Of Geeta Gopinath Pictures Flashed On Imf Wall
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..