

India Energy Supply
esakal
पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावर पुन्हा एकदा गंभीर संकट उभे राहिले आहे. इराणने अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून जगातील सर्वात महत्त्वाच्या ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ (होर्मुझची सामुद्रधुनी) बंद करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे भारताची ६० टक्क्यांहून अधिक एलपीजी आणि मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात प्रभावित होण्याची शक्यता आहे.