Hoshiarpur Bus Accidentesakal
देश
Bus Accident : समोरून आलेल्या कारला वाचवताना बसचा भीषण अपघात; 8 जण जागीच ठार, 32 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी
Hoshiarpur Bus Accident : बसचा वेग खूप जास्त होता. समोरून आलेल्या एका कारला वाचवण्यासाठी चालकाने अचानक वळण घेतले. त्यामुळे बसचे संतुलन बिघडले आणि ती रस्त्याच्या कडेला उलटली.
होशियारपूर : पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यात दसुहा येथे रविवारी एक भीषण बस अपघात (Hoshiarpur Bus Accident) झाला. प्रवाशांनी भरलेली खासगी बस अनियंत्रित होऊन उलटल्याने आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ३२ हून अधिक प्रवासी गंभीर जखमी (Punjab Road Crash) झाले आहेत. मृतांमध्ये एका आई-मुलीचाही समावेश आहे. हा अपघात दसुहा-हाजीपूर मार्गावरील सागरा बस स्टँडजवळ घडला.