esakal | कोरोनाने पोलिसाचा मृत्यू; तासाभरात मुलीनेही सोडला प्राण...
sakal

बोलून बातमी शोधा

hours after punjab cop dies of covid, visually impaired daughter also dies of shock at punjab

एका पोलिस अधिकाऱयाचा कोरोना मृत्यू झाला. पण, वडिलांचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर त्यांच्या अंध मुलीनेही एका तासात जीव सोडल्याची घटना येथे घडली. वडील आणि मुलीचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

कोरोनाने पोलिसाचा मृत्यू; तासाभरात मुलीनेही सोडला प्राण...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लुधियाना (पंजाब): एका पोलिस अधिकाऱयाचा कोरोना मृत्यू झाला. पण, वडिलांचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर त्यांच्या अंध मुलीनेही एका तासात जीव सोडल्याची घटना येथे घडली. वडील आणि मुलीचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

पंजाब येथील पयाल ग्रामीण उपविभागीय चौकीत सहाय्यक उपनिरीक्षक असलेल्या जस्पाल सिंह (वय 49) यांचा सोमवारी (ता. 10) कोरोनामुळे मृत्यू झाला. जस्पाल सिंह यांच्या निधनाच्या धक्क्याने त्यांच्या अंध मुलीनेही जीव सोडला आहे. लुधियाना येथील पोलिस लाईन्स येथे जस्पाल सिंह यांची नियुक्ती होती. मार्च महिन्यात त्यांच्यावर क्षयरोगाचा उपचार झाला होता. त्यांना मधुमेहही होता आणि त्याचा परिणाम त्यांच्या किडनीवरही झाला होता. काही दिवस ते वैद्यकिय रजेवर होते आणि 24 जुलैला ते पुन्हा कामावर रुजू झाले होते. 27 जुलैला त्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आणि त्यानंतर ते सेल्फ आयसोलेट झाले होते. जस्पाल सिंह यांचा कोरोनाने . सोमवारी बळी घेतला. जस्पाल यांचा मृत्यूनंतर तासाभरातच त्यांची 24 वर्षीय मुलगी नवप्रीत कौर हिनेही घरी प्राण सोडले. वडीलांचा मृत्यू झाल्यानंतर ती सावरली नाही. वडीलांच्या निधनाचे वृत्त समजताच काही मिनिटांनी ती जमिनीवर कोसळली आणि बेशुद्ध पडली. बेशुद्ध असतानाच तिचेही निधन झाले.

झोपेत असताना मोठ्याने घोरू नका म्हणाला अन्...

नवप्रीत 8 वर्षांची असाताना तिला मधुमेह झाला होता. मधुमेहामुळे तिची किडनी निकामी झाली आणि दृष्टीही गमावली. जस्पाल यांचा बहुतांश वेळ तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यातच जात होता. जस्पाल यांनी नवप्रीतची खूप काळजी घेतली. माझ्या बहिणीला बरं वाटावे म्हणून त्यांनी सर्व कमाई खर्च केली. उपचारासाठी कर्जही घेतले. परंतु, तिची प्रकृती बिघडतच गेली. सोमवारी वडीलांवर अंत्यसंस्कार करून आम्ही घरी परतलो. घरातील प्रत्येक जण रडत होतो आणि असे का होतेय, हे जाणून घेण्यासाठी ती सर्वांना विनंती करत होती. वडील कुठे आहेत, हे तिने विचारले आणि त्याचे उत्तर आमच्याकडे नव्हते. तासाभरात तिनेही प्राण सोडले,'असे जस्पाल यांचा मुलगा शरणदीप सिंह याने सांगितले.

खतरनाक विमान लँडींगचे व्हिडिओ व्हायरल...