India Vs Bharat: भारताचं नाव 'इंडिया' कसं पडलं? देशाच्या वेगवेगळ्या ७ नावांमागची कथा जाणून घ्या...

सध्या इंडिया या नावाऐवजी भारत हे नाव वापरण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यानिमित्ताने आपण देशाच्या नावाबद्दलचा इतिहास, नावाचा प्रवास या सगळ्याबद्दल जाणून घ्यायला हवं.
India And Bharat
India And BharatSakal

इंडिया नव्हे तर भारत. सध्या संपूर्ण देश या द्वंद्वात आहे. पण ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा संविधानातून इंडिया हा शब्द हटवण्यावर जोर दिला जात होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकांना इंडिया ऐवजी भारत हा शब्द वापरण्याचं आवाहन केलं आहे.

अशीही चर्चा होत आहे की मोदी सरकार १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या संसदेच्या विशेष सत्रामध्ये भारतीय संविधानातून इंडिया हा शब्द हटवण्याशी संबंधित विधेयक मांडू शकतं. या सगळ्या चर्चांदरम्यान आपण देशाच्या नावाबद्दलचा इतिहास, नावाचा प्रवास या सगळ्याबद्दल जाणून घ्यायला हवं.

India And Bharat
India vs Bharat : देशाच्या नावावरून संकुचित राजकारण! न्यायालयानेच दखल घ्यावी; मायावतींची भूमिका

प्राचीन काळापासूनच आपल्या देशाची अनेकविध नावं होती. प्राचीन ग्रंथांमध्ये देशाचा उल्लेख विविध नावांनी करण्यात आला आहे. यामध्ये जम्बूदीप, भारतखंड, हिमवर्ष, अजनाभ वर्ष, आर्यावर्त या नावांचाही समावेश आहे. आपापल्या काळानुसार, इतिहासकारांनी हिंद, हिंदुस्तान, भारतवर्ष, इंडिया अशी नावंही आपल्या देशासाठी वापरलेली आहेत. पण यापैकी भारत हे नाव सर्वात लोकप्रिय आहे.

'आजतक'ने दिलेल्या माहितीनुसार, विष्णुपुराणामध्ये असा उल्लेख आहे की समुद्राच्या उत्तरेपासून ते हिमालयाच्या दक्षिणेपर्यंत भारताच्या सीमा आखलेल्या आहेत. विष्णु पुराणानुसार, जेव्हा ऋषभदेव नग्नावस्थेत वनामध्ये गेले, तेव्हा त्यांनी आपला ज्येष्ठ पुत्र भरत याला आपला उत्तराधिकारी बनवलं. तेव्हापासून आपल्या देशाचं नाव भारतवर्ष पडलं.

India And Bharat
India Vs Bharat : 'तुम्ही आता बीजेपीमध्ये जा!' 'भारत माता की जय' बोलणं अमिताभ यांना पडलं महागात

भारत आणि भारतवर्ष ही नावं कशी मिळाली?

या नावाबद्दल अनेक दावे केले जातात. पुराणयुगातल्या समजुतीनुसार, भरत नावाच्या अनेक व्यक्ती होऊन गेल्या आहेत, ज्यांच्या नावावर आपल्या देशाचं नाव ठेवलं असा दावा केला जातो. एक समजूत अशीही आहे की महाभारतामध्ये हस्तिनापूरचे राजा दुष्यंत आणि शकुंतला यांचा पुत्र भरत याच्या नावावरुन देशाचं नाव ठेवण्यात आलं. तसंच भरत हा एक चक्रवर्ती सम्राटही होता. या सम्राटाला चारही दिशांच्या जमिनीचा स्वामी असं म्हटलं जातं. एक दावा असाही केला जातो की सम्राट भरतच्या नावावरुन देशाचं नाव भारतवर्ष असं पडलं. संस्कृतमध्ये वर्ष याचा अर्थ जागा अथवा परिसर असाही होतो.

सर्वात महत्त्वाची आणि सर्वमान्य समजुतीनुसार, प्रभू श्रीरामांचे भाऊ भरत यांच्या नावावरुन या देशाचं नाव भारत असं पडलं. श्रीराम चरित मानसानुसार, भरतने राम वनवासाला गेल्यानंतर त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार केला, पण भरत स्वतः कधीही राजा बनले नाहीत. त्यांच्याच नावावरुन देशाचं नाव भारत असं ठेवण्यात आलं. तर नाट्यशास्त्राचे जनक मानल्या जाणाऱ्या भरतमुनींच्या नावावरुन आपल्या देशाचं नाव ठेवलं गेलं, अशीही एक समजूत आहे.

'इंडिया' हे नाव कसं पडलं?

'आजतक'ने दिलेल्या वृत्तानुसार, इंग्रज जेव्हा आपल्या देशामध्ये आले तेव्हा त्यांनी सिंधू प्रदेशाला इंडस व्हॅली असं संबोधलं. त्याच आधारे या देशाचं नाव 'इंडिया' असं पडलं. भारत किंवा हिंदुस्तान म्हणणं अवघड वाटत होतं आणि 'इंडिया' म्हणणं सोपं, म्हणूनही हे नाव प्रचलित होत गेलं, असंही मानलं जातं. त्यामुळे भारताला 'इंडिया' असंही म्हटलं जातं.

India And Bharat
INDIA: 'इंडिया आणि भारत'मधील फरक सांगणारा लालूंचा जूना VIDEO; सोशल मीडियावर होतोय व्हायरल

'हिंदुस्तान' हे नाव कसं मिळालं?

मध्ययुगामध्ये जेव्हा तुर्क आणि इराणी लोक भारतात आले तेव्हा त्यांनी सिंधू खोऱ्यातून देशात प्रवेश केला. ते स अक्षराचा उच्चार ह असा करायचे. अशा पद्धतीने सिंधूचा अपभ्रंश हिंदू असा झाला आणि इथूनच आपल्या देशाचं नाव 'हिंदुस्तान' पडलं, असा उल्लेख आजतकने दिलेल्या वृत्तामध्ये आहे.

जम्बूद्वीप

जम्बू प्रजातीच्या झाडांमुळे भारताला जम्बूद्वीप हे नाव मिळालं होतं. विष्णू पुराणाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये जम्बू झाडाची फळं हत्तीप्रमाणे महाकाय असल्याचं म्हटलं आहे. जेव्हा ही फळं कुजतात आणि डोंगराच्या शिखरावर खाली पडतात, तेव्हा त्यांच्या रसापासून नदी तयार होते, असं मानलं जातं. यावरुन भारताचं नाव जम्बू्द्वीप असल्याचा उल्लेख आहे.

भारतखंड

वेद, पुराण, महाभारत आणि रामायणासह अन्य कित्येक भारतीय ग्रंथांमध्ये भारतखंड या नावाचा उल्लेख आहे. भारताचा भाग किंवा भारताची भूमी यासाठी हा शब्द वापरला गेला.

आर्यावर्त

आर्य मूळचे भारतातले होते, असं मानलं जातं. ते समुद्राच्या मार्गाने इथं आले आणि आर्यांनी या देश वसवला. म्हणूनच या देशाला आर्यावर्त किंवा आर्यांची भूमी मानलं जातं.

हिमवर्ष

हिमालयाच्या नावाने भारताला आधी हिमवर्ष असं संबोधलं जायचं. वायु पुराणातही काही ठिकाणी भारतवर्षाचं नाव हिमवर्ष असल्याचा उल्लेख आढळतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com