काँग्रेस अध्यक्षाची निवड कशी होते? पक्षाच्या संविधानात दिली आहे संपूर्ण प्रक्रिया

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 25 August 2020

काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कसा निवडला जातो आणि त्याची प्रक्रिया काय आहे, हे आपण पाहुया...

नवी दिल्ली- काँग्रेसचे (congress) नेतृत्व कोण करणार यावरुन पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (soniya gandhi) यांनी पायउतार होण्याची तयारी दाखवली आहे. त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना नवा अध्यक्ष शोधण्यास सांगितलं आहे. मात्र, पुढील अध्यक्ष कोण होणार यावरुन घोडं अडलं आहे. खासदार राहुल गांधी (rahul gandhi) यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनतर सोनिया गांधी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा बनल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच त्यांचा हंगामी अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला आहे. मात्र, नवा अध्यक्ष निवडला जाईपर्यंत त्याचं अध्यक्षा राहणार आहेत. काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कसा निवडला जातो आणि त्याची प्रक्रिया काय आहे, हे आपण पाहुया...

कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम, रोजगार घटले; रिझर्व्ह बँकेचा वार्षिक अहवाल

काँग्रेस पक्षाच्या संविधानात अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सविस्तरपणे दिली आहे. काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणजे काँग्रेसची वर्किंग कमेटी (सीडब्ल्यूसी) congress working committee अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर करते. त्यानंतर पक्षाचे कोणतेही 10 प्रतिनिधी संयुक्तपणे अध्यक्षपदासाठी एकाच्या नावाचा प्रस्ताव पक्षासमोर ठेवतात. पक्षाच्या संविधानाच्या अनुच्छेद 12 नुसार, प्रदेश काँग्रेस कमेटीचे सर्व सदस्य भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य असतात.  सर्वसामान्य निवडणुकीप्रमाणे, काँग्रेसमध्येही नामाकंन भरल्यानंतर ते परत घेण्यासाठी सात दिवसांचा अवधी दिला जातो. 

अध्यक्षपदासाठी एकच उमेदवार असल्यास त्याला काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून घोषित केलं जातं. काँग्रेसच्या पूर्ण अधिवेशनात पक्षाचा नवा अध्यक्ष कार्यभार ग्रहण करतो. काँग्रेस अध्यक्षाचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. त्यानंतर पुन्हा निवड केली जाते. अध्यक्षपदासाठी अनेक उमेदवार उभे असल्यास, विजेत्या उमेदवाराला कमीतकमी 50 टक्के मतं मिळणे आवश्यक असते. काँग्रेस वर्किंग कमेटीजवळ हंगामी अध्यक्ष निवडण्याचेही अधिकार असतात. 

प्रशांत भूषण प्रकरणात काय झालं? वाचा दिवसभरातील महत्वाच्या 7 बातम्या

स्तातंत्र्यापासून आतापर्यंत एकूण 19 व्यक्ती काँग्रेसच्या अध्यक्षपदावर विराजमान झाले आहेत. यात 19 पैकी 5 अध्यक्ष नेहरु-गांधी घराण्यातील आहेत, तर 12 अध्यक्ष नेहरु-गांधी घराण्याबाहेरील होते. आतापर्यंत नेहरु-गांधी घराण्यातील पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी अध्यक्षपद भूषवलं आहे. यातील सोनिया गांधी या सर्वाधिक काळ अध्यक्षपदी (18 वर्षे) राहिल्या आहेत. गांधी घराण्याबाहेरील कोणताही व्यक्ती अध्यक्षपदावर जास्त काळ राहू शकलेला नाही. 

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How is the Congress President elected The whole party process