esakal | मोदींनी जाहीर केलेल्या पीएम केअर्सला करू शकता मदत; वाचा कोणाची किती मदत
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra-Modi

मदतीसाठी तपशील असा :
खात्याचे नाव - PM CARES 
खाते क्रमांक - 2121PM20202 
आयएफएसी कोड - SBIN0000691 
स्वीफ्ट कोड - SBININBB104 
बँकेचे नाव-शाखा - स्टेट बँक ऑफ इंडिया, नवी दिल्ली मुख्य शाखा 
युपीआय आयडी - pmcares@sbi

मोदींनी जाहीर केलेल्या पीएम केअर्सला करू शकता मदत; वाचा कोणाची किती मदत

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शनिवारी पीएम-केअर्स नावाने विशेष निधी सुरु केला असून त्यासाठी मदतीचे आवाहन जनतेला केले. देणगीच्या रकमेनुसार आयकरात सवलतही जाहीर करण्यात आली. केअर्सचे दीर्घ रुप सिटीझन अॅसिस्टन्स अँड रिलीफ फंड इन इमर्जन्सी सिच्यूएशन्स असे आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जगभरात 25 हजार आणि देशात 21 बळी घेतलेल्या या महामारीविरुद्ध मुकाबला करण्यासाठी योगदान देण्याची इच्छा समाजातील सर्व स्तरातील लोकांनी व्यक्त केली आहे. सुदृढ देश घडविण्यासाठी याचा दूरगामी फायदा होईल. त्यासाठी आपण कोणतीही कसर सोडता कामा नये, भविष्यात असे संकट ओढवले तर या निधीचा उपयोग होईल, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. 

सलाम तुमच्या कार्याला; संकटात मदत करावी टाटा समूहासारखी!

कोणाची किती मदत?
टाटा उद्योग समूह - 500 कोटी 
उद्योगपती अनिल अगरवाल - 100 कोटी
मुकेश अंबानी - 5 कोटी महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधी
उद्योगपती अनिता डोंगरे - 150 कोटी

'लॉकडाऊन'मध्ये काम करणाऱ्यांना 'ही' कंपनी देणार २५ टक्के ज्यादा पगार!

अक्षय कुमारचे २५ कोटी 
अभिनेता अक्षय कुमार याने पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपल्या बचतीमधून 25 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. सेलीब्रीटींनी जाहीर केलेल्या मदतीत हा आकडा सर्वाधिक आहे. अक्षय कुमारने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ही अशी वेळ आहे जेव्हा लोकांचा जीव सर्वाधिक महत्त्वाचा आहे. त्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही आणि प्रत्येक गोष्ट करूयात. चला सारे एकत्र येऊन जीव वाचवूयात. जान है तो जहान है. 
त्याच्या या ट्वीटला मोदी यांनी, एक महान कृती असा प्रतिसाद दिला आहे.

loading image