आठवी पास अभिजीत धनंजय सराग ते कालीचरण होण्यापर्यंत, जाणून घ्या सर्वकाही

Kalicharan Maharaj profile
Kalicharan Maharaj profilegoogle

Kalicharan Maharaj Profile : राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबद्दल काही दिवसांपूर्वी धर्म संसदेत केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेल्या कालीचरण महाराज यांना मध्य प्रदेशातील खजुराहो येथून अटक करण्यात आली आहे. धर्म संसदेत कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी महात्मा गांधींच्या हत्येबद्दल नथुराम गोडसेचे कौतुक करत धर्माच्या रक्षणासाठी लोकांनी कट्टर हिंदू नेत्याची सरकार निवडून दिले पाहिजे असे सांगितले होते, परंतु कालीचरण महाराज कोण आहेत? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. चला जाणून घेऊया..

हे मुळचे अकोल्याचे..

कालीचरण महाराज हे मुळचे महाराष्ट्रातील अकोला शहरातील असून त्यांचे बालपण अकोल्याच्या शिवाजी नगर येथील भावसार पंचबंगला भागात गेले. ते एका सामान्य कुटुंबातील व्यक्ती असून त्यांचे खरे नाव अभिजित धनंजय सराग आहे आणि ते भावसार समाजाचे आहेत. तसेच या कालीचरण महारांजाचे वडील धनंजय सराग हे जैन चौकात मेडिकलचे दुकान चालवतात.

भैय्युजी महाराज यांच्याकडून दीक्षा घेतलेल्या कालीचरण उर्फ ​​अभिजीत सराग यांनी शिवाजी नगर परिषद शाळेत आठवीपर्यंतच शिक्षण घेतले आहे. पुढे अभ्यासात रस नसल्यामुळे त्यांच्या आई-वडिलांनी कालीचरणला त्यांच्या मावशीच्या घरी इंदौरला पाठवले. इथेच ते मराठीतून हिंदी बोलायला शिकला. तसेच यानंतर संत भय्यूजी महाराजांच्या आश्रमात जाऊ लागले, त्यांना तेथील कामाची आवड निर्माण झाली आणि येथूनच त्यांना भय्यूजी महाराज गुरु म्हणून लाभले. अशा प्रकारे पुढे अभिजीत सराग हे कालीचरण महाराज या नावाने ओळखले जाऊ लागले

Kalicharan Maharaj profile
फरार कालीचरण बाबाला अखेर अटक

शिव तांडव स्त्रोतापासून प्रसिद्धी

कालीचरण स्वतःला शिवभक्त म्हणवतात. ते लाल रंगाचे कपडे घालतात आणि कपाळावर लाल टिळा लावतो. ते दरवर्षी अकोल्यातील कावंद यात्रेत सहभागी होतात. कालिचरण महाराज त्यांचे रुप आणि श्रृंगार यामुळे चर्चेत राहतात. कालीचरण महाराज यांनी गेल्या वर्षी मध्य प्रदेशात शिव तांडव स्तोत्र गायल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि तेव्हापासून ते प्रसिद्धीझोतात आले. त्याचा हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

काय आहे प्रकरण

रायपूरच्या रावण भटा मैदानावर गेल्या रविवारी दोन दिवसीय कार्यक्रमात कालीचरण महाराज यांनी राष्ट्रपिता गांधी यांच्या विरोधात छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे झालेल्या धर्म संसंदेत वादग्रस्त वक्तव्य केले होते. महात्मा गांधी विरोधातील कालीचरण यांच्या या वक्तव्याचा राजकीय पक्षांनी निषेध करत कालीचरण यांच्यावर कारवाईची मागणी केली. दरम्यान रायपुर पोलिसांनी मध्यप्रदेशच्या खजूराहोमधून अटक केली (Kalicharan Maharaj Arrest News). कालीचरणने महात्मा गांधींवर टीका करताना भाषेची मर्यादा ओलांडत अपशब्दांचा वापर केला होता. या घटनेनंतर देशभरातून त्यांच्यावर कारवाईची मागणी होत होती. या प्रकरणात आता छत्तीसगड पोलिसांनी कालीचरणवर देशद्रोहाचा गुन्हा सुद्धा दाखल केला आहे.

Kalicharan Maharaj profile
विरोधानंतरही नागालँडमध्ये AFSPA कायदा वाढवला; गृह मंत्रालयाचे आदेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com