
Pakistan India War: पाकिस्तानकडून काल रात्री अर्थात ८ मेच्या रात्री भारताच्या सीमेवरील राज्यांमधील विविध ठिकाणांवर ड्रोन्स हल्ले केले. एकामागून एक असे अनेक ड्रोन्स पाकिस्तानकडून डागण्यात आले. पाकच्या या संभाव्य हल्ल्याला भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमनं चोख प्रत्युत्तर दिलं आणि पाकचे हे बहुतेक ड्रोन्स हवेतच नष्ट केले. पण काल नेमकं काय घडलं? पाकिस्ताननं किती ड्रोन्सच्या माध्यमातून हल्ला केला आणि भारताच्या किती ठिकाणांना टार्गेट केलं? याची इत्यंभूत माहिती आज परराष्ट्र मंत्रालयानं पत्रकार परिषद घेऊन दिली.