

Dharmendra Pradhan salary
esakal
Union Cabinet Minister salary : केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना वेतनासह अनेक सुविधा सरकारकडून दिल्या जातात. त्यासाठी दरमहा मोठा खर्च केला जातो. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उदाहरणातून या सुविधा समजून घेऊया.
धर्मेंद्र प्रधान यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान 'झेड' सुरक्षा देण्यात आली होती. या सुरक्षेत सुमारे २२ सुरक्षा कर्मचारी असतात. या ताफ्यात एनएसजीचे चार ते पाच कमांडो, दिल्ली पोलिसांचे जवान आणि एस्कॉर्ट वाहनांचा समावेश असतो. या सुरक्षेवर दरमहा सुमारे १५ ते २० लाख रुपये खर्च होत असल्याचे सांगितले जाते.