FasTag हवाय? पण...

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

FasTag चे चार्जेस 

- FasTag कोणासाठी?

नवी दिल्ली : टोल नाक्यावर अनेक चारचाकी वाहनांची गर्दी होत असे. मात्र, FasTag मुळे ही गर्दी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होत आहे. हायवेवर येणाऱ्या वाहनांसाठी FasTag बंधनकारक करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

FasTag बाबत बरीचशी माहिती अनेकांना नाही. वाहनावर FasTag चे स्टिकर्स असल्यास रांगेत न थांबता थेट निघता येते. या FasTag चे 29 फेब्रुवारीपर्यंत 100 रुपये माफ करण्यात आले आहे. मात्र, त्यासाठी 200 ते 400 रुपयांपर्यंतची रक्कम डिपॉझिट करावी लागणार आहे. मात्र, त्यासाठी 100 ते 300 रुपयांचा बॅलेन्स असावा लागणार आहे.

इंदुरीकर महाराजांवर शासन गुन्हा दाखल करणार नाही

FasTag चे चार्जेस :

वाहनावर लावण्यास येणाऱ्या FasTag चे काही ठराविक चार्जेस आहेत. त्यासाठी 200 ते 400 रुपयांची रक्कम भरावी लागणार आहे. याबाबत एसबीआयच्या FasTag विभागाच्या मते, fastag.onlinesbi.com. FasTag धारकाने 100 ते 300 रुपये खात्यात ठेवणे गरजेचे आहे. 

Image result for fastag esakal

सरकारी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने याबाबतचे पत्रक प्रसिद्ध केले आहे. 

15 डिसेंबरपासून लागू झाला निर्णय 

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने 1 डिसेंबरपासून राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या टोल नाक्‍यांवर दुचाकी सोडून सर्व गाड्यांना फास्टॅग अनिवार्य करण्यात आले होते. मात्र, नंतर ही मुदत 15 डिसेबरपर्यंत वाढविण्यात आली.

FasTag कोणासाठी?

महामार्गावरुन वाहतूक करणाऱ्या प्रत्येक मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना त्याचप्रमाणे प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांना फास्ट टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. फास्टटॅगमधून केवळ तीन चाकी वाहनांना मात्र वगळण्यात आलेले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How Much You Need To Pay To Get A FASTag Stickers