esakal | इंदुरीकर महाराजांवर शासन गुन्हा दाखल करणार नाही
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री कडू हे इंदुरीकर महाराजांच्या बाजूने उभे राहिले आहेत. त्यांनी इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याचे समर्थन केले नसले तरी यावरून वाद वाढविणे अपेक्षित नसल्याचे अप्रत्यक्षरीत्या सांगितले. एखादे प्रवचनकार बोलत असताना चुकू शकतात. त्यांच्याकडून एखादे वाक्‍य चुकीचे गेले म्हणजे काय झाले?, असे म्हणत त्यांनी इंदुरीकर महाराजांची बाजू घेतली आहे.

इंदुरीकर महाराजांवर शासन गुन्हा दाखल करणार नाही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद : राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू हे निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या बाजूने उभे राहिले आहेत. महाराजांवर शासन गुन्हा दाखल करणार नाही. नोटीस दिली म्हणून काय झाले? जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना ते सोमवारी (ता. 17) बोलत होते.

निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या वक्तव्यावरून सध्या चांगलाच गदारोळ सुरू आहे. यामध्ये राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री कडू हे इंदुरीकर महाराजांच्या बाजूने उभे राहिले आहेत. त्यांनी इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याचे समर्थन केले नसले तरी यावरून वाद वाढविणे अपेक्षित नसल्याचे अप्रत्यक्षरीत्या सांगितले.

हेही वाचा - Video: अबब...! मोबाईल ‘रेंज’साठी झाडावर स्वारी

हे वाचलंत का?- हे तर पाकीटमार सरकार ; वृंदा कारत यांचा आरोप

खादे प्रवचनकार बोलत असताना चुकू शकतात. त्यांच्याकडून एखादे वाक्‍य चुकीचे गेले म्हणजे काय झाले?, असे म्हणत त्यांनी इंदुरीकर महाराजांची बाजू घेतली आहे. त्यामुळे शासनाकडूनही इंदुरीकर महाराजांना दिलासा मिळण्याचे संकेत मिळत आहेत. शिवाय श्री. कडू यांनी महाराजांवर गुन्हा दाखल करणार नसल्याचे सांगितल्याने हा वाद शमण्याचे चित्र दिसत आहे.

दरम्यान, मुलगा-मुलीच्या जन्माबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर वादात अडकले आहेत. इंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ नागरिक पुढे येत आहेत. त्यांच्यासाठी आंदोलने करण्याची तयारी काही जणांकडून सुरु असल्याचे वृत्त आहे. मात्र, इंदुरीकर महाराजांनी आपल्यासाठी कुणीही मोर्चे, आंदोलने करू नये, असे आवाहन पत्रकाद्वारे करीत शांतता राखण्याचे आवाहन केले.