
पहलगाम येथील क्रूर दहशतवादी हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांचा भारतीय सैन्य, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे ‘ऑपरेशन महादेव’ अंतर्गत खात्मा केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत या ऑपरेशनची सविस्तर माहिती दिली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ‘ऑपरेशन सिंदूर’वर झालेल्या 16 तासांच्या चर्चेत सत्तापक्ष आणि विरोधकांमध्ये तीव्र वादविवाद झाले. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी धर्म विचारून निरपराध नागरिकांची हत्या केल्याचा शाह यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. “या क्रूर कृत्याचा मी निषेध करतो आणि मृतांच्या कुटुंबियांप्रती सहानुभूती व्यक्त करतो,” असे त्यांनी सांगितले.