घरबसल्या काढता येणार 'युनिव्हर्सल पास'; जाणून घ्या

सार्वजनिक तसेच खाजगी वाहनं आणि रेल्वे तसेच विमानांमधून प्रवास करण्यासाठी युनिव्हर्सल पास बंधनकारक
Universal Travel Pass Maharashtra
Universal Travel Pass Maharashtraesakal
Updated on

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना व्हायरसने (Corona virus) संपूर्ण जगाला वेठीस धरलंय. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच साऊथ आफ्रिकेत कोरोना व्हायरसचा 'ओमिक्रॉन' (Omicron) हा नवा व्हेरिएंट सापडलाय. जागतिक आरोग्य संघटनेनंही (World Health Organisation- WHO) त्याला ‘घातक आणि संक्रमक’ अशा वर्गवारीत ठेवले आहे. त्यामुळे जगभरात विशेष काळजी घेतली जात आहे. (Universal Travel Pass Maharashtra)

भारतातही आतापर्यंत ओमिक्रॉनचे तीन रुग्ण सापडले असून देशभरातील आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर आहे. कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी युनिव्हर्सल पास सक्तीचा करण्यात आला आहे. सार्वजनिक वाहतूक, रेल्वे (Universal Pass Local Train), खासगी बस सुविधा, विमाने यांतून प्रवास करताना तसेच मॉल, सिनेमागृहे, नाटय़गृहे अशा ठिकाणी आता ‘युनिव्हर्सल पास’ बंधनकारक करण्यात येत आहे. त्यामुळे युनिव्हर्सल पास काढणं गरजेचं आहे. (Universal Pass For Double Vaccinated Citizens)

Universal Pass कसा मिळवायचा याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

Universal Travel Pass Maharashtra
आता लोकल प्रवासासाठी युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास!

युनिव्हर्सल पास कसा मिळवायचा? (Universal Pass how to apply)

ज्या व्यक्तींनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, अशा व्यक्तींनाच युनिव्हर्सल पास मिळणार आहे. हा पास ऑनलाइन पद्धतीने सहजपणे मिळवता येतो. (Who is eligible for Universal Travel Pass?)

सुरुवातीला तुम्ही http://epassmsdma.mahait.org या वेबसाईटवर जा. त्यानंतर तुम्हाला citizens हा पर्याय निवडा. आता ‘universal pass for double vaccinated citizens’ या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर आपण कोरोना लसीकरणासाठी नोंदणी करताना जो मोबाईल क्रमांक नमूद केलेला आहे, तो क्रमांक दिलेल्या पर्यायात टाकावा. त्यानंतर तत्काळ या रजिस्टर मोबाईलवर ओटीपी अर्थात One Time Password एसएमएसद्वारे प्राप्त होईल.

Universal Travel Pass Maharashtra
मुलुंड मधील नागरिकांना मोफत युनिव्हर्सल स्मार्ट कार्ड पास

हा ओटीपी नमूद केल्यावर तुम्हाला तुमचं नाव, मोबाईल क्रमांक समोर दिसेल. सर्व तपशील योग्य असल्याची खात्री झाल्यावर जनरेट पास (Genrate Pass) या पर्यायावर क्लिक करा. आता तुमच्या दोन्ही कोविड लसींचा तपशील (लस घेतल्याची तारीख, वेळ) तुम्हाला दिसेल. तिथे सेल्फ इमेज Self image हा पर्याय असेल. तिथे तुम्ही स्वतःचा सेल्फी किंवा गॅलरीतून एखादा फोटो अपलोड करू शकता.

हे सर्व झाल्यावर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ई-पास जनरेट झाल्याचा एसएमएस येईल. या मॅसेजमधील लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचा युनिव्हर्सल पास डाऊनलोड (How can I download universal pass for Mumbai local?) करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com