esakal | मुलुंड मधील नागरिकांना मोफत युनिव्हर्सल स्मार्ट कार्ड पास
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुलुंड मधील नागरिकांना मोफत युनिव्हर्सल स्मार्ट कार्ड पास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुलुंड - आता पूर्णपणे लसीकरण (Vaccination) केलेल्या नागरिकांना युनिव्हर्सल (Universal Pass) पास साठी अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. तथापि, अजूनही असे बरेच लोक आहेत जे आधुनिक तंत्रज्ञानाशी (Teconology) परिचित नाहीत आणि त्यांना युनिव्हर्सल पास मिळवणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे अशा लोकांना मदत करण्यासाठी मुलुंडचे (Mulund) आमदार मिहीर कोटेचा (Mihir Kote) यांनी पूढाकार घेतला आहे. लोकांना युनिव्हर्सल पास मिळवून देण्यासाठी त्यांनी एक मोहीम सुरू केली आहे.

या उपक्रमाबद्दल माहिती देताना आमदार मिहीर कोटेचा यांनी सांगितले, "मला स्मार्टफोनवरून युनिव्हर्सल पास मिळवण्यात येणाऱ्या अडचणींबाबत लोकांकडून अनेक तक्रारी येत आहेत. अनेक लोकांनी मला सांगितले की त्यांना अँप डाऊनलोड करताना समस्या येत आहेत."

त्यामुळे कोणत्याही अडचणीशिवाय आम्ही मुलुंडकरांना मोफत युनिव्हर्सल कार्ड देत आहोत. आम्ही सोमवारपासून मोहीम सुरू केली असून १००० पेक्षा जास्त लोकांना त्यांचा युनिव्हर्सल पास मिळाला आहे.

हेही वाचा: लोकांनी वाढविलेला लॉकडाउन...!

ज्या लोकांनी लसीकरणाचे दोन डोस घेतले आहेत आणि ज्यांचे दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशा नागरिकांना युनिव्हर्सल पास मोफत रित्या आमच्याकडून बनवून मिळेल असे आमदार कोटेचा यांनी सांगितले. एकूण २५००० नागरिकांना मोफत युनिव्हर्सल स्मार्ट कार्ड देण्याचा आमचा मानस आहे कोटेचा पुढे म्हणाले कि राज्य सरकारच्या वेबसाइट https: / / epassmsdma.mahait.org वरून फक्त युनिव्हर्सल कार्ड डाउनलोड करा आणि माझ्या कार्यालयातर्फे जारी केलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठवा - ८४५४८५८८३३ जेणेकरून तुम्हाला आम्ही युनिव्हर्सल पास मोफत देऊ शकू..

loading image
go to top