Ration Card: घरच्या सदस्याचं रेशन कार्डमध्ये नाव नाही? 'असे' करा घरबसल्या अपडेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ration Card

Ration Card: घरच्या सदस्याचं रेशन कार्डमध्ये नाव नाही? 'असे' करा घरबसल्या अपडेट

Ration Card News: रेशन कार्ड हे तुमच्या संपूर्ण कागदपत्रांमधील एक असून तुम्हाला प्रत्येक ठिकाणी याचं काम पडू शकतं. अशा वेळी तुमच्या घरात एखादा नवा सदस्य जन्माला आला असेल किंवा एखाद्याचं नाव नोंदवायचं राहून गेलं असेल तर हा सोपा उपाय तुमचं रेशन कार्ड अपडेट करण्यास उपयोगी ठरेल. कारण तुमच्या कुटुंबातील सदस्यानुसार तुम्हाला रेशन दुकानातून धान्य मिळतं.

या ठिकाणी राशन कार्ड अतिआवश्यक

रेशन कार्ड तुमच्याकडे असणारं एकप्रकारचं आयडेंटीटी कार्डच ठरतं. त्यामुळे यात तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचं नाव असणं गरजेचं आहे. त्यासाठी ही सोपी प्रोसेस तुम्ही समजून घ्यावी. या प्रोसेसद्वारे तुम्ही घरबसल्या रेशन कार्ड अपडेट करू शकाल. त्यासाठी लागणारे कागदपत्र एकदा वाचा.

हेही वाचा: Ration Card: रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी, १५ कोटी धारकांना होणार नव्या नियमाचा फायदा

रेशन कार्ड अपडेशनसाठी लागणारी कागदपत्रे

1) रेशन कार्डची ओरीजनल कॉपी

2) मुलाच्या जन्माचं प्रमाणपत्र

3) आई-वडिलांचं आधार कार्ड

4) रेशन कार्डमध्ये नवविवाहितेचं नाव जोडायचं झाल्याचं तिचे आधारकार्ड, विवाह प्रमाणपत्र आणि तिच्या आई-वडिलांचंही आधारकार्ड लागेल.

हेही वाचा: Ration Card वर मोबाईल नं. अपडेट करायचा? फॉलो करा ही प्रोसेस

घरबसल्या असे अपडेट करा रेशन कार्ड

सगळ्यात आधी प्रशासनाच्या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा.

त्यानंतर Add New Member या ऑप्शनवर जा. त्यानंतर फॉर्म ओपन होईल.

आता इथे तुमच्या परिवाराची डिटेल्स अपडेट करा.

फॉर्मसोबतच तुम्हाला डॉक्युमेंटची सॉफ्ट कॉपीही अपडेट करावी लागेल.

फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळेल.

हेही वाचा: Ration card : या कुटुंबांना आता २ रुपये दराने रेशन मिळणार नाही

तुमच्या फॉर्मला तुम्ही पोर्टलवरूनही ट्रॅक करू शकता. यानंतर विभाग तुमच्या डॉक्युमेंट्स आणि फॉर्मचं व्हेरिफिकेशन करेल. फॉर्म एक्सेप्ट केल्यानंतर नवीन रेशन कार्ड तुमच्या घरी येईल.