मनसुख हिरेन यांची हत्या कशी झाली? फडणवीसांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम 

fadnvis
fadnvis

मनसुख हिरेन यांची आत्महत्या नसून ती हत्याच आहे असा पुनरुच्चार करताना त्यांची हत्या कशी झाली? याच्या कथित कट-कारस्थानाचं संपूर्ण कथन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिल्लीत पत्रकार परिषदेत केलं. 

फडणवीस म्हणाले, "मनसुख हिरेन यांना एपीआय सचिन वाझे हे पहिल्यापासूनच ओळखत होते. स्कॉर्पियो कारही त्यांनी हिरेन यांच्याकडून खरेदी केली होती पण या खरेदी व्यवहाराचे पैसे त्यांना दिले नव्हते. नोव्हेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत चार महिने ही कार वाझे यांच्याकडेच होती. हिरेन यांनी त्यांना कार परत मागितली होती, त्यानंतर त्यांना काही दिवस ही कार आपल्याकडे ठेवून हिरेन यांना परत देण्यात आली, पण ती पुन्हा त्यांच्याकडून घेण्यात आली. दरम्यान, वाझे यांच्याकडून ही कार हरवल्याचं दाखवण्यात आलं. त्यानंतर हिरेन यांना आपली कार हरवल्याची तक्रार करण्यास सांगण्यात आलं. सुरुवातीला कुर्ला पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही. पण नंतर वाझेंचा कुर्ला पोलिसांना फोन आला आणि हिरेन यांची तक्रार घेण्यात आली. त्यानंतर या पोलीस स्टेशनमधील कोणत्याच पोलीस अधिकाऱ्याने त्यांची चौकशी केली नाही तर वाझेच हिरेन यांच्याशी प्रश्नोत्तर करत होते"

दरम्यान, वाझे यांनी हिरेन यांना वकिलांमार्फत तक्रार दाखल करण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर आपल्याच ओळखीच्या वकिलांकडे हीच तक्रार मुख्यमंत्र्यांसह विविध ठिकाणी पाठवण्यात आली. त्यानंतर ज्या दिवशी मनसुख यांना एक फोन आला ज्यामध्ये गावडेने तुम्हाला बोलावलं आहे, असा उल्लेख आहे. त्यांना ज्या भागात बोलावण्यात आलं तिथेच वाझे यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल आहे, असा दावाही यावेळी फडणवीस यांनी केला.

आमचा दावा आहे की मनसुख हिरेन यांना त्याच ठिकाणी मारण्यात आलं. मारल्यानंतर त्यांचा मृतदेह खाडीत टाकण्यात आला. यातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे हा मृतदेह समुद्राच्या भरतीच्यावेळी फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, केवळ अर्ध्या तासाच्या फरकामुळे भरती ऐवजी ओहोटी सुरु झाली आणि त्यामुळे त्यांचा मृतदेह त्याच ठिकाणी पडून राहिला. दरम्यान, शवविच्छेदन अहवालातही हिरेन यांच्या शरिरावर जखमा झाल्याचे दिसून आले आहे, असा दावाही यावेळी फडणवीस यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com