Delhi Bomb Threat : सरकारी रुग्णालयांनंतर दिल्लीतील विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी

Delhi Bomb Threat : सरकारी रुग्णालयांनंतर दिल्लीतील विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी

नवी दिल्लीः दिल्लीतल्या वेगवेगळ्या रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. त्यानंतर आता दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय एअरपोर्टला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा देणारा मेल प्राप्त झाला आहे.

काही दिवसांपूर्वी दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर रविवारी दोन हॉस्पिटल्सना बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलच्या माध्यमातून मिळाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दिल्ली पोलीस घटनास्थळी पोहोचले असून सर्च ऑपरेशन युद्ध पातळीवर सुरु आहे.

यातच आता आणखी एक अपडेट येत असून इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय एअरपोर्टालाही धमकीचा मेल मिळाला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. एअरपोर्टवर तपासणी सुरु असून एकाच मेल आयडीवरुन रुग्णालये आणि एअरपोर्टला धमकीचा मेल मिळालेल आहे. दुपारी साधारण तीन वाजता हा मेल पाठवण्यात आलेला होता. पोलिसांच्या तपासामध्ये आतापर्यंत तरी एअरपोर्टवर काहीही मिळालेलं नाही.

दरम्यान, ईमेल मिळाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांची टीम आणि बॉम्ब स्क्वॉड पथक घटनास्थळी दाखल झालं होतं. ज्या रुग्णालयांना धमकीचे मेले मिळालेले आहेत त्यामध्ये बुराडीचं सरकारी रुग्णालय आणि मंगोलपुरीचं संजय गांधी रुग्णालय यांचा समावेश आहे.

Delhi Bomb Threat : सरकारी रुग्णालयांनंतर दिल्लीतील विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी
Covid subvariant: चिंता वाढली! राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे 'इतके' रुग्ण आढळले, पुण्यात 51 तर ठाण्यात 20

दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, रुग्णालयांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा मेल मिळाल्यानंतर पोलिसांना याची खबर देण्यात आली. या प्रकरणी स्थानिक पोलिस तपास करत असून सध्या तरी काहीही आक्षेपार्ह सापडलेलं नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com