Hubali Relway Staton : हुबळी स्टेशनचं नाव जगात गाजतंय! गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालीय नोंद, कारण ऐकून अभिमान वाटेल

हुबळी रेल्वे स्टेशनची नोंद गिनिजमध्ये, इतका लांब आहे प्लॅटफॉर्म
Hubali Relway Staton
Hubali Relway Statonesakal

कर्नाटकातील हुबळी रेल्वे स्थानक हे जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म बनले आहे. 1,507 मीटर लांबी असलेल्या या स्टेशनचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे.

या प्लॅटफॉर्मचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. 20 कोटी रुपये खर्चून सुमारे 20 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला हा प्लॅटफॉर्म हुबली यार्डच्या रीमॉडेलिंगचा एक भाग आहे.

Hubali Relway Staton
Ahmedabad Test Attendance Record : मोदींच्या उपस्थितीतच नरेंद्र मोदी स्टेडियमने रचला इतिहास; कसोटी क्रिकेटमध्ये आता...

हुबळी रेल्वे स्थानकाला श्री सिद्धरुद्ध स्वामीजी स्टेशन असे म्हणतात. दक्षिण रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्लॅटफॉर्ममुळे दोन गाड्या एकाच वेळी दोन दिशांकडून ये-जा करू शकतात.

Hubali Relway Staton
Dhirendra Shastri यांच्या कार्यक्रमानंतर Police Station बाहेर रांगा, 5 लाख किमतीचे दागिने चोरीला

हुबळीच्या स्थानकावरील हा प्लॅटफॉर्म दीड किलोमीटर अंतराचा आहे. या प्लॅटफॉर्मचे बांधकाम फेब्रुवारी २०२१ मध्ये सुरू करण्यात आले होते. हुबळी येथील हे जंक्शन बंगळुरु, होसापेटे आणि वास्को द गामा या ठिकाणांशी जोडले गेलेले आहे. हुबळी रेल्वे स्थानकात वाढत असलेली गर्दी पाहून आणखी तीन प्लॅटफॉर्म येथे बांधण्यात आले आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक ८ हा १ हजार ५०७ मीटर आहे. त्यामुळे हा प्लॅटफॉर्म जगातला सर्वात लांब प्लॅटफॉर्म म्हणून गौरवला जातोय.

Hubali Relway Staton
Police Station Division : जळगाव जिल्ह्यातील 10 पोलिस ठाण्यांचे विभाजन

नैर्ऋत्य रेल्वेअंतर्गत हुबळी, बंगळूर व म्हैसूर विभाग येतात. हुबळी विभागात ११५ हून अधिक रेल्वे स्टेशन आहेत. यामध्ये बेळगावचाही समावेश आहे. हुबळी येथे सध्या ५ प्लॅटफॉर्म आहेत. यात आणखी ४ प्लॅटर्फार्म बनविण्यात येणार होते. मात्र, जागा अपुरी असल्याने फक्त तीनच प्लॅर्टफार्म बनविण्यात येणार आहेत. या ठिकाणी एकूण ८ प्लॅटफॉर्म असणार आहेत.

Hubali Relway Staton
Bihar Station : पटना स्टेशनवरील 'त्या' Porn Videoची चर्चा सातासमुद्रापार! 'तीने'देखील केलं ट्वीट

एक क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्याचे कामही सुरु झाले आहे. यापूर्वी हा प्लॅटफॉर्म ५०० मीटर लांब होता. यापूर्वी या प्लॅटफॉर्म 1400 मीटरपर्यंत वाढविण्याची योजना आखण्यात आली होती. मात्र, नैर्ऋत्या रेल्वेने याची लांबी १५०५ मीटरपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या उत्तर प्रदेश गोरखपूर येथील प्लॅटफॉर्म १३६६ मीटर लांब आहे. सध्या जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म म्हणून या प्लॅटर्फार्मला ओळखले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com