Hubballi KIMS Hospital
esakal
हुबळीतील किम्स रुग्णालयात नवजात बाळाच्या गर्भाशयात दुसरा गर्भ आढळला
जगभरातील फक्त २०० प्रकरणांपैकी हुबळीत नोंदवलेला पहिला प्रकार
कुंडगोल तालुक्यातील महिलेची प्रसूतीदरम्यान ही दुर्मीळ घटना उघड
बंगळूर : हुबळीचे किम्स रुग्णालय (Hubballi KIMS Hospital) एका दुर्मीळ घटनेचे साक्षीदार बनले आहे. इथे एका नवजात बाळाच्या गर्भाशयात आणखी एक गर्भ आढळला. ही दुर्मीळ घटना जगभरात फक्त २०० प्रकरणांमध्ये नोंदवली गेली आहे. तथापि, येथे नोंदवलेला हा पहिलाच प्रकार आहे.