फरिदाबादमधील बॅटरी बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Three killed in fire at battery factory in faridabad

बॅटरी बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यू

फरिदाबाद सेक्टर ३७ मधील बॅटरी बनवणाऱ्या कारखान्यात शनिवारी (ता. २१) भीषण आग (Huge fire) लागली. या आगीत तिघांचा मृत्यू (died) झाला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. आग लागली तेव्हा कारखान्यात काम सुरू होते. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. (Three killed in fire at battery factory in faridabad)

आठवडाभरापूर्वी फरिदाबादच्या (Faridabad) अनंगपूर येथील केमिकल फॅक्टरीला आग (Huge fire) लागली होती. त्यावेळी अग्निशमन विभागाच्या १५ गाड्यांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले होते. या अपघातात कुणाचाही जीव गेला नव्हता. मात्र, आजच्या आगीमुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. आग इतकी भीषण होती की, तीन कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू (died) झाला.

हेही वाचा: ...अन् उरले फक्त सांगाडे; मृतदेहांची ओळख सुद्धा पटली नाही

अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मृतदेह (died) बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचबरोबर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Web Title: Huge Fire At A Battery Factory All Three Died On The Spot Faridabad Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Crime Newsfiredeath
go to top