esakal | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांचा स्फोट! सहा महिन्यातील सर्वात मोठी वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांचा स्फोट! सहा महिन्यातील सर्वात मोठी वाढ

Coronavirus Cases India Updates : लागोपाठ ८ व्या दिवशी ५० हजारांपेक्षा जास्त रुग्णांची वाढ पाहायला मिळाली

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांचा स्फोट! सहा महिन्यातील सर्वात मोठी वाढ

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

Coronavirus Cases India Updates : भारतामध्ये कोरोना महामारीची दुसरी लाट आली असून रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. १७२ दिवसानंतर पहिल्यांदात विक्रमी ७२ हजारांपेक्षा जास्त नवीन कोरोना रुग्ण आढळळे आहेत. तर लागोपाठ ८ व्या दिवशी ५० हजारांपेक्षा जास्त रुग्णांची वाढ पाहायला मिळाली आहे. तर ५ डिसेंबर २०२० नंतर पहिल्यांदाच साडेचारशेपेक्षा जास्त रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं गुरुवारी सकाळी दिलेल्या आकडेवारीनुसार, मागील २४ तासांत देशात ७२ हजार ३३० नवीन कोरोना रुग्ण आढळले तर ४५९ जणांच्या मृत्यूची  नोंद झाली आहे. यादरम्यान ४० हजार ३८२ जण करोनामुक्तही झाले आहेत. याआधी १० ऑक्टोबर रोजी ७४ हजार ३८३ कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. 

हेही वाचा : LPG Gas Cylinder price : सर्वसामान्यांना दिलासादायक बातमी

 एकवेळ भारतामध्ये कोरोना महामारी आटोक्यात आल्याचं चित्र झालं होतं. एक फेब्रुवारी २०२१ रोजी देशात ८ हजार ६३५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. ही यंदाच्या वर्षातील सर्वात कमी रुग्णवाढ होय. एक फेब्रुवारीनंतर पुन्हा एकदा देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव पसरला. दरम्यान देशात आतापर्यंत २४ कोटी ४७ लाख ९८ हजार ६२१ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यामधील ११ लाख २५ हजार ६८१ चाचण्या ३१ मार्च रोजी घेण्यात आले आहेत. 

आजची देशातील कोरोनाची स्थिती - 
एकूण रुग्णांची संख्या -
एक कोटी 22 लाख 21 हजार 665
कोरोनामुक्त - एक कोटी 14 लाख 74 हजार 683
उपचाराधीन रुग्ण -  ५ लाख 84 हजार 55
मृत्यू - एक लाख 62 हजार 927
लशीकरण - 6 कोटी 51 लाख 17 हजार 896 डोस
 

loading image