Hukkeri Taluka Election
esakal
हुक्केरी तालुका विद्युत संघ निवडणुकीत स्वाभिमानी पॅनेलने सर्व १५ जागांवर विजय मिळविला.
रमेश कत्ती, आमदार निखिल कत्ती व ए. बी. पाटील समर्थकांनी जल्लोष साजरा केला.
जारकीहोळी व जोल्ले गटाच्या पॅनेलचा पराभव झाला.
संकेश्वर : बेळगाव जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतलेल्या व प्रतिष्ठेची लढत ठरलेल्या हुक्केरी तालुका विद्युत संघाच्या निवडणुकीत (Hukkeri Taluka Election) माजी मंत्री ए. बी. पाटील व माजी खासदार रमेश कत्ती यांच्या स्वाभिमानी पॅनेलने (Swabhimani Panel) दणदणीत विजय मिळविला. विरोधी पालकमंत्री सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi) व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या अप्पणगौडा पाटील पॅनेलचा धुव्वा उडाला.