नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी (Huma Qureshi) यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा चुलत भाऊ आसिफ कुरेशी (Asif Qureshi Killed) याची दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पार्किंगच्या किरकोळ वादातून घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.