esakal | भयानक! कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या पत्नीचा पतीनं केला शिरच्छेद

बोलून बातमी शोधा

police case filed against a Corona patients parents for abusing health workers Nashik Crime News
भयानक! कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या पत्नीचा पतीनं केला शिरच्छेद
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पाटणा : पत्नीचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पतीनं तिचा थेट शिरच्छेद केल्याचा भयानक प्रकार समोर आला आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पतीनं टेरेसवरुन उडी घेऊन आत्महत्या केली. बिहारमधील मुनाचक भागातील एका सोसायटीत या जोडप्याच्या घऱीच हा प्रकार घडला. विशेष म्हणजे पत्नीची हत्या करणारा पती उच्च शिक्षित असून रेल्वेमध्ये कामाला होता.

हेही वाचा: तामिळनाडू : बंद झालेला वेदांताचा स्टरलाइट प्लान्ट ऑक्सिजन निर्मितीसाठी पुन्हा होणार सुरु

अतुल लाल असं पतीचं नाव असून पत्नी तुलिका कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्याने तिचा शिरच्छेद करुन हत्या केली. पत्नीची हत्या केल्यानंतर अतुल थेट सोसायटीच्या टेरेसवर गेला आणि त्याने खाली उडी घेतली यामध्ये त्याचा मृत्यू झाला. टाइम्सनाऊ न्यूजनं याबाबत वृत्त दिलं आहे.

कोलकात्यात दोनपैकी एका व्यक्तीला कोरोनाची लागण

पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुका होत आहेत. आतापर्यंत ६ टप्प्यांतील मतदान प्रक्रिया पार पडली असून २६ एप्रिल आणि २९ एप्रिल रोजी उर्वरित दोन टप्प्यांतील मतदान घेण्यात येणार आहे. निवडणुकीनिमित्त काढण्यात आलेल्या रॅली, मोर्चे, जाहीर सभा यांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. ही शक्यता आता खरी ठरताना दिसत आहे. कारण शनिवारी (ता.२४) पश्चिम बंगालमध्ये १४ हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळले असून ५९ जणांचा मृत्यूही झाला आहे. तेथील एकूण मृतांची संख्या १० हजार ८८४ वर पोहोचली आहे.