esakal | पत्नीला प्रियकराच्या मिठीत पाहिलं अन् केला स्फोट...

बोलून बातमी शोधा

husband blast in ayodhya two people injured at uttar pradesh

प्रियकरासोबत पत्नीला नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर चिडलेल्या पतीने घरावर बॉम्ब फेकला. या घटनेत दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पत्नीला प्रियकराच्या मिठीत पाहिलं अन् केला स्फोट...
sakal_logo
By
वृत्तसंस्था

अयोध्या (उत्तर प्रदेश) : प्रियकरासोबत पत्नीला नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर चिडलेल्या पतीने घरावर बॉम्ब फेकला. या घटनेत दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मुलाच्या प्रेयसीवर गेली बापाची वाईट नजर अन्...

अयोध्याच्या काशिराम कॉलनीत ही घटना घडली. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले तर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'अयोध्यामधील कांसीराम कॉलनी येथे एका स्कूटरस्वाराल्याने देशी बॉम्बस्फोट घडवला आहे. यामध्ये दोघे जखमी झाले. पती-पत्नीच्या वादातून बॉम्ब फेकण्यात आला. पतीने खोलीमध्ये पत्नी आणि तिच्या प्रियकराला नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर त्याचा राग अनावर झाला आणि त्याने थेट घरावर बॉम्ब फेकल्याचे माहिती समोर आली. पती-पत्नीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. त्यामुळे पत्नी त्याच्यापासून दुसरीकडे राहत होती. याचा पतीला राग होता. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.'

थांब, तुझ्या मनावरील बोजा कायमचाच उतरवतो...

पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, 'पतीपासून विभक्त राहत होते. पतीला याचा राग होता. यापूर्वी त्याने अनेकदा पत्नीला जिवे मारण्याची धमकी दिली होती. घरी आल्यानंतर मला मित्रासोबत पाहिल्यानंतर त्याने बॉम्ब हल्ला केला.'

नवऱयाने दोघांना 'त्या' अवस्थेत पकडले मग...

पोलिस अधिकारी अमर सिंह यांनी सांगितले की, 'पती-पत्नीच्या वादारामध्ये पतीने घरावर बॉम्ब हल्ला केला आहे. या संपूर्ण प्रकरणात पतीला ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.'

दोघांनी 182 युवतींशी संभोग करून तयार केले एमएमएस...